शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

पनवेल महापालिके साठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

By admin | Updated: April 7, 2016 01:22 IST

पनवेल महापालिकेच्या स्थापनेला गती प्राप्त झाली आहे. येत्या महाराष्ट्र दिनापूर्वी ही नवी महापालिका अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई पनवेल महापालिकेच्या स्थापनेला गती प्राप्त झाली आहे. येत्या महाराष्ट्र दिनापूर्वी ही नवी महापालिका अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीची ११ एप्रिलला अंतिम बैठक होत आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३0 एप्रिलपर्यंत पनवेल महापालिकेची अधिकृत स्थापना होण्याची शक्यता उच्चपदस्थ सूत्राने वर्तविली आहे.प्रस्तावित महानगरपालिकेत पनवेल तालुक्यातील १७३ पैकी ६६ गावे, आठ सिडको वसाहती व पनवेल शहराचा समावेश आहे. या नव्या महापालिकेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका पार पडल्या आहेत. या अभ्यास समितीकडून पनवेल महानगरपालिका कशी असावी, त्याची भौगोलिक रचना, आर्थिक स्रोत व पायाभूत सुविधांवरील खर्च याविषयी अभ्यास केला आहे. यात पाणीपुरवठ्याचा ही आढावा घेण्यात आला आहे. अभ्यास समितीने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार प्रस्तावित महापालिकेची लोकसंख्या ८ लाखांच्या घरात पोहचली आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार या नव्या महापालिकेचा समावेश ड वर्गात होण्याची शक्यता आहे. संभाव्य तांत्रिक मुद्यांच्या आधारावर या महापालिकेला क दर्जा मिळावा यासाठी प्रशासकीय स्तरावर पयत्न सुरू आहेत. अभ्यास समितीची अंतिम बैठक ११ एप्रिल रोजी होणार आहे. या बैठकीनंतर ही समिती तातडीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. एकूणच महाराष्ट्र दिनापूर्वी म्हणजे ३० एप्रिल २०१६ पर्यंत पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर व्हावे, यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.