शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

आदई तलावाचे होणार सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 05:22 IST

लवकरच निविदा प्रक्रिया : लोकप्रतिनिधींनी केला होता पाठपुरावा

कळंबोली : रहिवाशांना क्षणभर विश्रांती त्याचबरोबर विरंगुळ्याकरिता आदई तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी रामशेठ ठाकूर विचार मंचाने केली होती. त्यानुसार आराखडा तयार करून निविदा प्रक्रि या सुद्धा झाली होती. परंतु जीएसटीमुळे संबंधित एजन्सीने माघार घेतल्याने काम रखडले होते. मात्र बुधवारी पार पडलेल्या बैठकीत सिडको अध्यक्षांनी जीएसटीसह फेरनिविदा काढून हे काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आदई तलावावर भूखंड तयार करून एका संस्थेच्या घशात घालून कोट्यवधी रुपयांची मलई खायचा उद्देश सिडकोतील अधिकाºयांचा होता. मात्र स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी स्थानिकांना बरोबर घेऊन सिडकोच्या या धोरणाविरोधात चळवळ उभी केली. संबंधित तलाव बुजू नये याकरिता शेट्टी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी नात्याने सिडकोवर दबाव आणला याशिवाय आजूबाजूच्या लोकांना त्यांनी जागृत केले. यामुळे तलाव बुजविण्याचा निर्णय बासनात बांधून ठेवावा लागला. त्यापाठीमागे शेट्टी यांचा लढा महत्त्वपूर्ण ठरला. हा तलाव नैसर्गिक असल्याने पावसाचे पाणी या ठिकाणी साचू शकते याखेरीज वातावरण थंड राहण्यासही मदतही होते. या ठिकाणी गणपतींचे विसर्जन त्याचबरोबर छट पूजा होत असल्याने या जलाशयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. वास्तविक पाहता तलावाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. असे असतानाही प्रशासनाकडून याबाबत कानाडोळा केला जात होता. या तलावात मोठ्या प्रमाणात कचरा त्याचबरोबर डेब्रिज टाकण्यात येते, याशिवाय आजूबाजूच्या झाडांचा पालापाचोळा पडल्याने पाणी दूषित होते. त्याचा परिणाम तलावातील जलचरांवर पडत होता. नवीन पनवेलकरांसाठी या महत्त्वाच्या नैसर्गिक जलस्रोताची साफसफाई करण्याची मागणी वारंवार सिडकोकडे करण्यात आली आहे.या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. बुधवारी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.आदई तलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रि या झाली होती, परंतु संबंधित ठेकेदाराने जीएसटी करामुळे हे काम परवडणार नाही असे कारण देवून माघार घेतली. त्यामुळे हा आराखडा आणि इस्टिमेटमध्ये बदल करण्यात येईल. त्याचबरोबर जीएसटीसहित निविदा प्रसिद्ध करून एजन्सी नियुक्त करण्यात येईल.- भगवान साळवी,कार्यकारी अभियंता,सिडको नवीन पनवेल नोड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई