शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये आदिवासी तरुणांना बेदम मारहाण, आठ जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 02:56 IST

विद्युत पुरवठा खंडित प्रकरणावरून काही जणांनी खारघर टेकडीवर असलेल्या फणसवाडी या आदिवासी पाड्यातील चार तरुणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी ८ जणांवर मारहाण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पनवेल : विद्युत पुरवठा खंडित प्रकरणावरून काही जणांनी खारघर टेकडीवर असलेल्या फणसवाडी या आदिवासी पाड्यातील चार तरुणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी ८ जणांवर मारहाण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.खारघर गावातील कुणाल सदाशिव पाटील यांचे फणसवाडी पाड्याला लागून फॉर्महाउस आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फॉर्महाउसवर एका तरु णाची वाढदिवसाची पार्टी सुरू होती. फॉर्महाउसवर वीजजोडणी घेण्यात आलेल्या विद्युतखांबावरून आगीचे गोळे दिसू लागल्याने फणसवाडी पाड्यातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाºयांनी येवून फॉर्महाउसवरील विद्युत पुरवठा खंडित केला. पाड्यातील तरु णाने महावितरणला माहिती दिल्याचा राग धरून फॉर्महाउसवर पार्टी करीत असलेले कुणाल पाटील, अंकुश शामराव गिरी, गोरखनाथ पांडुरंग पाटील, राजेश पदू पाटील, प्रणव सुनील कासारे, अरु ण पाटोळे, संतोष होळकर, नरसू ऊर्फ नरसिंह भगवान पाटील आदी व्यक्तीने पाड्यातील नामदेव बबन पारधी, महादेव पारधी, रामा पारधी आणि संतोष भले या चार तरु णांना लाकूड फाटा आणि लोखंडी सळीने मारहाण केली. या मारहाणीत नामदेव आणि संतोष यांच्या डोक्याला टाके बसले आणि महादेव आणि रामा या दोघांना बेदम मारहाण केली. या सर्वांवर उपचार करून सोडून देण्यात आले आहे.खारघर पोलिसांनी जीवे ठार मारण्याची धमकी देणे,धारधार हत्याराने मारहाण आण िजीवे मारहाण आदि कलाम खाली आण िअनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कारवाई केली आहे.या प्रकरणी तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड म्हणाले आठही आरोपींना सोळा तरीखे पर्यंत पोलीस कोठडी थोटावण्यात आली असून कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.