शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनाविनाच ‘आदर्श आगार’ खुले

By admin | Updated: May 29, 2016 03:12 IST

उद्घाटनापूर्वीच चर्चेचा विषय ठरलेले घणसोलीतील आदर्श आगार अखेर उद्घाटनाविनाच वापरासाठी खुले करण्यात आले आहे. या आगारातून तूर्तास चार मार्गांवर बस धावत असून, आठवडाभरात

नवी मुंबई : उद्घाटनापूर्वीच चर्चेचा विषय ठरलेले घणसोलीतील आदर्श आगार अखेर उद्घाटनाविनाच वापरासाठी खुले करण्यात आले आहे. या आगारातून तूर्तास चार मार्गांवर बस धावत असून, आठवडाभरात पूर्ण क्षमतेने आगार वापरासाठी खुले होणार आहे. आगाराच्या उद्घाटनात प्रोटोकॉल पाळण्याच्या आयुक्तांकडून सूचना आल्यामुळे उद्घाटन आजी की माजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार, यावरून राजकीय वातावरण तापले होते.महापालिकेची परिवहन सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घणसोली सेक्टर १५ येथे ९.५ एकर जागेत आगार उभारण्यात आले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या आगाराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. त्याकरिता ठेकेदाराला मार्च २०१६ अखेरपर्यंतची मुदत देण्यात आलेली. त्यानुसार नुकतेच आगाराचे काम पूर्ण होताच त्याच्या उद्घाटनाच्या हालचाली प्रशासनाने चालवल्या होत्या. परंतु आगाराच्या उद्घाटनात निमंत्रित पाहुण्यांच्या बाबतीत प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याऐवजी विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता निर्माण झालेली. यामुळे शहरातले राजकीय वातावरण तापून राष्ट्रवादी विरुद्ध आयुक्त मुंढे असे चित्र निर्माण झाले होते.यामुळे आदर्श आगाराकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच २६ मेपासून हे आगार वापरासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामागची खेळी प्रशासनाची की सत्ताधाऱ्यांची, हे मात्र उघड होऊ शकलेले नाही. सद्य:स्थितीला या आगारातून चार ते पाच मार्गांवर बस चालवल्या जात असल्याचे सूत्रांकडून समजले. मात्र अवघ्या सात ते आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने आगारातून सर्वच प्रस्तावित मार्गांवर बस सोडल्या जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच महापालिका परिवहनच्या ताफ्यात नव्या मिडी बस आलेल्या आहेत. घणसोली आगारातून सुरू असलेल्या मार्गावर त्याच गाड्यांचा वापर होत आहे. परंतु येत्या काही दिवसांत इतर प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या एनएमएमटीच्या गाड्या घणसोली आगारातून निश्चित मार्गांवर सोडल्या जाणार आहेत.