शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बॅनरवर कारवाई

By admin | Updated: April 21, 2016 02:33 IST

नेरळमधील साई मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची दोन दिवसांपूर्वी तोडफोड करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात

नेरळ : नेरळमधील साई मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची दोन दिवसांपूर्वी तोडफोड करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून कोल्हारे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अनेक अनधिकृत फलकावर कारवाई करून ते फलक कायमचेच काढून टाकले आहेत.नेरळमध्ये १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करणारे अनेक फलक लावण्यात आले होते. १५ एप्रिल रोजी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील बोपेले गावातील बौद्ध समाजाचे तरु ण रवींद्र जाधव यांना साई मंदिर नाक्यावर लावलेले बॅनरची मोडतोड कोणी करीत असल्याचे दिसून आले. त्यावर जाधव यांनी जवळ जावून पाहिले असता तत्काळ बॅनरची मोडतोड करीत असलेल्या कोल्हारे गावातील व्यक्तीला हटकले. तेव्हा जाधव यांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सकाळी कोल्हारे ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्त मागवून साई मंदिर भागात असलेले अनेक छोटे -मोठे सर्वच अनधिकृत फलक काढण्यात आले. असे अनेक फलक हटविल्याने साई मंदिर परिसर मोकळा झाल्याचे दिसते. तसेच नेरळ बसस्थानकातही मोठ -मोठे पोल उभारून भलामोठा फलक उभारण्यात आला होता. तो फलकही काढण्यात आला असून पोल काढण्याचे काम बाकी आहे, तेही लवकरात लवकर काढण्यात येणार असल्याचे कोल्हारे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)