शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीवर कारवाई '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 02:10 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटसमोरील अनधिकृत झोपडपट्टीवर सिडको व महापालिकेच्या पथकाने कारवाई केली

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटसमोरील अनधिकृत झोपडपट्टीवर सिडको व महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. १५० पेक्षा जास्त झोपड्या हटविण्यात आल्या आहे. याठिकाणी गांजा विक्री होत असल्यामुळे कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती.एपीएमसीजवळील सेक्टर १९ ए मधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या १५ भूखंडांवर १५० पेक्षा जास्त झोपड्यांचे बांधकाम झाले होते. याच ठिकाणी अनेक वर्षांपासून गांजा विक्रीचा अड्डा सुरू होता. अमली पदार्थ विरोधी पथक व एपीएमसी पोलिसांनी वारंवार कारवाई केल्यानंतरही अमली पदार्थांची विक्री थांबत नव्हती. एक तुरूंगात गेला की आरोपीचे इतर नातेवाईक त्या ठिकाणी व्यवसाय करत होते. अवैध व्यवसाय होत असल्यामुळे येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी होऊ लागली होती. यापूर्वीही सिडको व महापालिकेच्या पथकाने कारवाई केली होती. परंतु कारवाई झाली की पुन्हा अतिक्रमण होऊ लागले होते. शुक्रवारी सिडको व महापालिकेच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी कारवाई केली. १२ हजार चौरस मीटर भूखंड अतिक्रमणमुक्त केला आहे.पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी येथील भूखंडाला कुंपण घालून त्यांची विक्री केली जाणार आहे. हे भूखंड सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी राखीव आहेत. शुक्रवारी झालेल्या कारवाईमध्ये सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे एस. एस. पाटील, पी. बी. राजपूत, सी. व्ही. तांबडे, महापालिकेच्या विभाग अधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्यासह ८० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.