नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीसह व्यापाऱ्यांकडे हमी भावाची यादी देण्यात आली आहे. आवारांमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने विक्री करू नये. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिला.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटचे धर्मवीर संभाजीराजे बाजार संकुल असे नामकरण करण्यात आले. कृषी मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी १७६ भाजीविक्री केंद्रे सुरू केली आहेत. नाफेडच्या माध्यमातून ७० वर्षांतील सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट दर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.शेतकºयांची १३ कोटींची फसवणूकशासनाने थेट पणनचा निर्णय घेतल्यामुळे शेतकºयांचे नुकसानच होत असल्याचे मनसेचे आमदार शरद सोनावणे म्हणाले. जुन्नर तालुक्यात निर्यातदारांनी शेतकºयांकडून १३ कोटी ५० लाख रुपयांचे द्राक्ष खरेदी केले व पैसे न देता गायब झाले आहेत. एका तालुक्यात एवढी फसवणूक झाली आहे. राज्यातील फसवणुकीचा आकडा यापेक्षा जास्त आहे. शेतकºयांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.>धर्मवीर संभाजीराजे यांचे नाव देण्याचा निर्णय ऐतिहासिक - खोतधर्मवीर संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त भाजीपाला मार्केटचे नाव धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल, असे करण्याचा ऐतिहासिक निर्णय तब्बल २० वर्षांनंतर आमच्या सरकारने घेतला. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्व शेतकºयांचा आत्मा आहे. बाजार समितीमध्ये सर्वांनी विशेष लक्ष देऊन शेतमाल निर्यातीला चालना देण्याची गरज आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
हमीभावापेक्षा कमी दराने कृषी माल विकल्यास कारवाई-सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:46 IST