शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आरटीओची ६०४ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: June 19, 2017 05:10 IST

आरटीओने मागील सहा महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ६०४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश असून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आरटीओने मागील सहा महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ६०४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश असून, ठाणे-बेलापूर मार्गास उरण मार्गावर धावणारी खासगी वाहने सर्वाधिक आहेत. मात्र, अद्यापही अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या कारणावरून एनएमएमटी प्रशासनाने वाहतूक पोलीस, आरटीओच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले .खासगी वाहनांमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक आरटीओसह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली आहे. मिनी बस, जीप यामधून विविध मार्गांवर ही अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याचा परिणाम एनएमएमटीच्या प्रवासी संख्येवर होत आहे. ज्या मार्गावर एनएमएमटीच्या बस धावतात, त्याच मार्गावर बसच्या काही वेळअगोदर ही खासगी वाहने चालवली जातात. यामुळे बसच्या प्रतीक्षेत थांबलेले प्रवासी नाइलाजास्तव खासगी वाहनांतून प्रवास करतात. या वाहनचालकांकडून स्वत:च्या नफ्यासाठी काही मार्गावरील एनएमएमटीच्या बस बंद करण्याचाही प्रयत्न यापूर्वी झाला आहे. यामुळे आरटीओतर्फे मागील सहा महिन्यांत ६०४हून अधिक वाहनांवर कारवाई केली असल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. त्यामध्ये एनएमएमटी प्रशासनाद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार केलेल्या कारवायांचाही समावेश आहे. नुकतेच ठाणे येथे आरटीओ अधिकारी व परिवहन अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात आली होती. या वेळीही अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा चर्चेला आला होता; परंतु अद्यापही शहरात खासगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची खंत एनएमएमटीचे व्यवस्थापक शरद आरदवाड यांनी व्यक्त केली आहे. तर यासंबंधी अनेकदा आरटीओ व वाहतूक पोलिसांना पत्राद्वारे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. अनेकदा खासगी ट्रॅव्हलर्सकडूनही अवैध वाहतूक केली जाते. सिग्नल्स, ठिकठिकाणी अवैध थांबे करून वाहतूककोंडी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.