शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

तळीरामांवर कारवाई

By admin | Updated: June 2, 2016 01:40 IST

बीअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्या सात जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे घणसोली रेल्वे स्थानकासमोरील पदपथ पादचाऱ्यांच्या वापरासाठी मोकळे झाले आहेत.

नवी मुंबई : बीअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्या सात जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे घणसोली रेल्वे स्थानकासमोरील पदपथ पादचाऱ्यांच्या वापरासाठी मोकळे झाले आहेत.शहरातील बीअरशॉपीबाहेरच उघड्यावर केल्या जाणाऱ्या मद्यपानाचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यापैकी सीबीडी व घणसोली येथील काही ठिकाणी तळीरामांचे अड्डे झाले होते. बारमध्ये बसून पिण्याचा खर्च वाचवण्यासाठी बीअरशॉपीबाहेरच त्यांच्याकडून मद्यपान केले जायचे. याकरिता बीअरशॉपीचालकांकडूनही त्यांना अपेक्षित सहकार्य लाभत होते. मात्र या प्रकारामुळे सार्वजनिक वापराची जागा अथवा पदपथ तळीरामांकडून व्यापले गेल्यामुळे पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यानुसार रविवारी सीबीडी पोलिसांनी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली होती. तर मंगळवारी कोपरखैरणे पोलिसांनी सात जणांवर कारवाई केली आहे. घणसोली रेल्वे स्थानकासमोरील मिना बीअरशॉपीच्या बाहेरच उघड्यावर मद्यपान केले जायचे. या प्रकाराची रहिवाशांनी अनेकदा तक्रार देखील केलेली आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वीच कोपरखैरणे पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केलेली. त्यानंतरही उघड्यावर मद्यपान होत असल्यामुळे मंगळवारी रात्री पुन्हा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सात तळीरामांवर कारवाई केल्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सांगितले. तर यापुढेही त्या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.शहरात अद्यापही अनेक ठिकाणी बीअरशॉपीबाहेर करण्याचे प्रकार सुरूच आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने बीअरशॉपीचालकांविरोधात कारवाईची मोहीम राबवणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्यामुळे तळीरामांचे फावले जात आहे. सायन-पनवेल मार्गावर वाशीगाव येथे असलेल्या बीअरशॉपीबाहेर देखील रात्री उशिरापर्यंत असाच प्रकार सुरू असतो. मुख्य मार्गालगतचे हे ठिकाण असल्यामुळे मुंबईकडे जाणारे अनेक जण त्या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करतात. यामुळे रात्री उशिरापर्यंत हे बीअरशॉप खुले ठेवले जात असल्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)