शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यादवनगरमधील झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई

By admin | Updated: February 10, 2017 04:34 IST

पालिका व एमआयडीसी यांची यादवनगर परिसरातील अतिक्रमण विरोधी संयुक्त कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू होती. या वेळी ४५० झोपड्या जमीनदोस्त करून

नवी मुंबई : पालिका व एमआयडीसी यांची यादवनगर परिसरातील अतिक्रमण विरोधी संयुक्त कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू होती. या वेळी ४५० झोपड्या जमीनदोस्त करून तीन अनधिकृत तबेले पाडण्यात आले आहेत. या कारवाईअंतर्गत दोन दिवसांत सुमारे एक हजार अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या आहेत.शहरभर फैलावत चाललेल्या अनधिकृत झोपड्यांचे जाळे वेळीच थांबवण्याच्या उद्देशाने पालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार बुधवारी यादवनगर व देवीधाम पाडा येथून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाईच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणच्या सुमारे सहाशे झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका सुरूच होता. त्यानुसार गुरुवारी सुमारे ४५० झोपड्या व तीन तबेले जमीनदोस्त करण्यात आले. त्याशिवाय चिंचपाडा येथील बेकायदेशीर गोडाऊनही पाडण्यात आले. तर तबेल्यांमधील गाई व म्हशी ताब्यात घेऊन त्या वाशीतील कोंडवाड्यात ठेवण्यात आल्या आहेत. सदर भूखंड हे एमआयडीसीचे असून विविध वापरांसाठी ते राखीव आहेत; परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे भूखंड भूमाफियांनी बळकावून त्यावर झोपड्या उभारून त्यांची विक्री केलेली आहे. त्यानंतरही इतर मोकळे भूखंड बळकावण्याचे प्रकार सुरूच होते. यामुळे एमआयडीसी व पालिका या दोन्ही प्राधिकरणाने संयुक्तरीत्या त्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)