पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बोगस डॉक्टर्स व्यावसायिकांवर बोगस डॉक्टर्ससंदर्भात स्थापित केलेल्या पथकाने २२ फेब्रुवारी रोजी कारवाई करून त्यांच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीत बोगस डॉक्टर्सची नावेही छापण्यात आली होती. या बोगस डॉक्टरांमध्ये बाबुलाल पटेल (देवीचा पाडा), मनोज बिश्वास (देवीचा पाडा), राजकुमार गौड (तोंडरे), आबुराहण सरदार (पेंधर) या चार डॉक्टर्सचा समावेश आहे. चारही डॉक्टर्सवर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई करते वेळी तळोजा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश गीते, पनवेल महानगरपालिका बोगस डॉक्टर्स समिती सदस्य मनोज उकिर्डे, सहायक आयुक्त डॉ. पद्मिनी येवले, पालिका, तसेच ग्रामीणरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बी. एस. लोहारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पनवेलमधील चार बोगस डॉक्टर्सवर कारवाई
By admin | Updated: February 23, 2017 06:11 IST