शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीमध्ये बांधकामांवर कारवाई

By admin | Updated: January 14, 2017 07:08 IST

ऐरोली सेक्टर १ ते २० दरम्यान ८ भुखंडावरील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कारवाई केली. कारवाई दरम्यान विरोध होवू नये

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १ ते २० दरम्यान ८ भुखंडावरील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कारवाई केली. कारवाई दरम्यान विरोध होवू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवल्याने परिसराता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.सेक्टर १ मध्ये संजय भोसले यांनी ९४० चौरस मीटर क्षेत्रफळावर आरसीसी बांधकाम सुरू केले होते. सेक्टर २ मध्ये ४८ चौरस मीटर क्षेत्रफळावर दुर्गामाता विश्वस्त मंडळाने केलेले पत्र्याचे बांधकाम हटविण्यात आले. सेक्टर २० मध्ये उच्चदाबाच्या वीजवाहीनीखाली बी आर बिडवई, बी आर पांडे यांनी जय भवानी जेष्ठ नागरीक सेवा संस्थेचे कार्यालय तयार केले होते. याशिवाय ५५ चौरस मीटर क्षेत्रफळावर राजकीय पक्षांनी दोन गाळे तयार केले होते. ते गाळेही हटविण्यात आले आहेत. याशिवाय सिद्धीविनायक मित्र मंडळाने बांधलेले पत्रा शेड, विश्वशांती बुद्ध विहाराचे बांधकामही हटविण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी के जंगम, जी एस झिने, एस एस कडव, एम. सी. माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार होवू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप तिदार यांच्यासह २ अधिकारी व १०० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते. (प्रतिनिधी)