शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

माथाडी कायद्यासाठी कृती समिती

By admin | Updated: September 13, 2016 02:55 IST

तथाकथित संघटनांमार्फत माथाडी कायद्याचा दुरुपयोग करुन बेकायदा अर्थसत्ता पोसली जात आहे. त्यामुळे मालकवर्गासह उद्योग जगत हादरुन गेले आहे

आविष्कार देसाई,  अलिबागतथाकथित संघटनांमार्फत माथाडी कायद्याचा दुरुपयोग करुन बेकायदा अर्थसत्ता पोसली जात आहे. त्यामुळे मालकवर्गासह उद्योग जगत हादरुन गेले आहे. हा कल्याणकारी कायदा धाब्यावर बसविणाऱ्यांचे आर्थिक हात भ्रष्टाचाराच्या धडापासून वेगळे करण्यासाठी जिल्हास्तरावर लवकरच कृती समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. मालक, कामगार आणि उद्योग जगतात पसरलेला रोष त्या निमित्ताने निवळण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते.राज्यामध्ये विविक्षीत नोकऱ्यांमध्ये कामावर ठेवलेल्या, माथाडी, हमाल यासारख्या असंरक्षीत श्रमजीवी कामगारांच्या नोकरीचे नियमन, नोकरीच्या अटी, शर्तींची तांगली तरतूद, कल्याण, आरोग्यासह सुरक्षततेंच्या उपायांची तरतूद करण्यासाठी माथाडी, हमाल, श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ अस्तित्वात आले. या कायद्यानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड या विभागात वस्तुंवर आधारीत, तर राज्यभरात जिल्हा निहाय ३६ माथाडी मंडळे निर्माण करण्यात आली आहेत. माथाडी मंडळामार्फत माथाडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना माथाडी स्वरुपाचे कामकाज असलेल्या आस्थापनांना संबंधित माथाडी मंडळात मुख्य मालक म्हणून नोंदविण्यात येते. तेथील माथाडी कामगारांना ठराविक नोंदणी क्रमांक दिला जातो. कायदा अस्तित्वात आल्यापासून माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेकडो संघटना निर्माण झाल्या आहेत. त्यातील काही संघटना या सराकरी मान्यता प्राप्त आहेत. अशा संघटनांनी माथाडी कामगारांंच्या प्रश्नावर आवाज उठवून सरकारला न्याय देण्यास भाग पाडले . ३६ माथाडी मंडळाकडे सुमारे दोन लाख माथाडी कामगार आहेत, त्यापैकी रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ४० हजार माथाडी कामगार असल्याचे बोलले जाते. मालक आणि कामगार यांच्यामध्ये सुसंवाद साधने हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत मालकवर्गात अनभिज्ञता असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. काही तथाकथित संघटना कायद्याचा गैरवापर करीत आहेत. माल घेऊन आलेला ट्रक कंपनीच्या गेटवरच अडवून चालकाकडून माथाडींच्या नावावर एंन्ट्री टॅक्स वसूल करणे, मुख्य मालकाकडे कामगार भरतीकरता दबाव आणणे, बेकायदा रकमेची मागणी करणे अशा विविध घटनांनामुळे मालकांसह उद्योग जगतात असंतोष पसरला होता. याबाबतच्या तक्रारी ही सरकार दरबारी गेल्या होत्या. यावर उपाय म्हणून सरकारने जिल्हास्तरावर कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थीत होण्यासाठी जिल्हास्तरावर समिती काम करणार आहे. त्याबाबतचा निर्णय सरकराने संबंधितांना ६ सप्टेंबरला कळविला.