शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खांदा कॉलनीमधील अनधिकृत मंडईवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 02:04 IST

भूखंड केला अतिक्रमणमुक्त : पत्र्याचे शेड बांधण्याचे कामही सुरू : सिडकोने राबविली बंदोबस्तामध्ये मोहीम

पनवेल : खांदा कॉलनी सेक्टर ८ मधील सिडकोच्या मालकीच्या भूखंड क्र मांक ११ वरील अनधिकृत मंडईवर सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. पोलीस बंदोबस्तामध्ये येथील फेरीवाल्यांना हटविण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी भूखंडाभोवती पत्राशेड बांधण्यास सुरुवात केली आहे.

येथील भूखंडावरील टपऱ्या, दोन पार्टी आॅफिस, चिकन, भाजी, फळे, दूध डेअरी आदी दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. येथे सुमारे ५,५०० स्केअर मीटरवर जागेवर सिडको गृहप्रकल्प उभारणार आहे. सिडकोचे एक लाख घरे बांधणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एक प्रकल्प या ठिकाणी होणार असल्याने सिडकोच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलीस व सिडकोचा मोठा फौजफाटा या ठिकाणी उपस्थित होता. कारवाई केल्यानंतर तत्काळ भूखंडाभोवती पत्रे मारण्याचे कामही सिडकोमार्फत त्वरित सुरू करण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून ही उपाययोजना केली आहे. या वेळी काही प्रमाणात विरोधदेखील दर्शविण्यात आला. दोन जेसीबीच्या साहाय्याने सर्व दुकाने निष्कासित करण्यात आली.अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे अधिकारी विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित फेरीवाल्यांचे फेरीवाला धोरणांतर्गत सर्वेक्षण होऊनही पुनर्वसन न करता सिडकोने कारवाई केल्याने स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी कारवाईचा निषेध केला. पुनर्वसन न करता अशाप्रकारे फेरीवाल्यांचे वाºयावर सोडणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.कारवाई सिडकोची; मोर्चा मात्र पालिकेवरखांदा कॉलनीमधील ही कारवाई सिडकोच्या मार्फत करण्यात आली. मात्र, येथील फेरीवाल्यांनी सेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या वेळी मोठ्या संख्येने पालिकेच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. यासंदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी वेळ दिल्याने आंदोलन मागेघेण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल