शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात मोहीम तीव्र, पनवेल महापालिकेची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:28 IST

पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करून महापालिकेने तीन लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तसेच ९३३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

पनवेल : पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करून महापालिकेने तीन लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तसेच ९३३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.पनवेल महापालिकेने पर्यावरणाला मारक ठरणाºया प्लास्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती, विक्री आणि वापरावर कठोर निर्बंध घातले आहेत. असे असले तरी शहरात आजही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत मागील दोन महिन्यांत १३५ व्यापाºयांवर कारवाई करून तब्बल ९३३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे, तसेच संबंधितांकडून तीन लाख ४० हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कामोठे, कळंबोली, खारघर, तक्का, पनवेल, नावडे, रोहिंजन, तळोजा या आठ विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात पनवेल महापालिका हद्दीत प्लास्टिकबंदीचा ऐतिहासिक ठराव संमत करण्यात आला होता, तेव्हापासून व्यापारी व नागरिकांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्यासाठी जनजगृती करण्यात येत आहे. पर्यावरण विभागाच्या सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे, कामोठे विभागाचे अधीक्षक प्रकाश गायकवाड, आरोग्य निरीक्षक भावेश चंदने, कळंबोली विभागाचे अधीक्षक भगवान पाटील, आरोग्य निरीक्षक मनोज चव्हाण, रोहिंजन विभागाचे अधीक्षक संजय देशमुख, आरोग्य निरीक्षकयोगेश कस्तुर आदीच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीpanvelपनवेल