शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी परिसरातील गुटखा विक्रेत्यांवर कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल

By नामदेव मोरे | Updated: November 22, 2023 19:05 IST

बाजार समितीमध्ये व बाहेरील पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

नवी मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील हॉटेल बाहेर असलेल्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. दिवसभर मोहीम राबवून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पानटपरी सील करून गुटख्याचा साठा जप्त केला आहे.

बाजार समितीमध्ये व बाहेरील पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनविभागाच्या कोकण सहआयुक्त सरला खटावकर यांनाही याविषयी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी सकाळपासून पानटपऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली. दिवसभर पाच टपऱ्यांमध्ये गुटखा विक्री सुरू असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी मनोज चौरसासीया, अब्दूल शेख, श्रीकांत दत्ता, भोलानाथ चौरासीया व विरेंद्रकुमार खेलवान या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मॅफ्को मार्केट परिसरातील हॉटेलबाहेरील या पानटपऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी संबंधीतांवर एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.अवैध गुटखा विक्रीविरोधात मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

कायमस्वरूपी कारवाई व्हावीअन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. बाजार समितीमधील मार्केट आवार व बाहेरील कारवाईनंतर सील केलेल्या पानटपरींवर कायमस्वरूपी कारवाई करावी. अनधिकृतपणे व्यवसाय करणारांच्या टपऱ्या हटविण्यात याव्यात व पुन्हा अवैध व्यवसाय सुरू राहणार नाही याची काळजी घेण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.