शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 02:19 IST

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांची मोहीम

नवी मुंबई : अवघ्या एका महिन्यात ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. वाशी येथे आयोजित संवाद व्यवस्थेशी या कार्यक्रमास ते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत शुक्रवारी वाशी येथे संवाद व्यवस्थेशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी गतमहिन्यात तब्बल ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. वाहतुकीच्या नियमांबाबत पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. यानंतरही अनेकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. यातून अपघातांनादेखील निमंत्रण मिळत असून अनेकांचे प्राणदेखील जात आहेत. परिणामी, अशा वाहनचालकांवर कारवाईचे पाऊल वाहतूक पोलिसांना उचलावे लागत आहे. त्यानुसार, विविध कलमांतर्गत गतमहिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमास पालिका आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, पनवेल आरटीओ अधिकारी अभय देशपांडे, अमोल खैर, प्राचार्या शुभदा नायक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विकास देशमुख हे देखील उपस्थित होते. त्यांनीदेखील उपस्थितांना रस्ते अपघातांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. वाहतूक पोलीस व नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयॊजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.वाहतुकीच्या नियमांबाबत वाहतूक पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. यानंतरही नियमांची पायमल्ली होत आहे.