शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या मैदानामागे उभ्या केलेल्या ७१ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:50 IST

कोपरखैरणेत ११ वाहने जप्त : नवी मुंबईत राबविणार मोहीम

नवी मुंबई :  कोपरखैरणे परिसरातील मोकळ्या मैदानामागे उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ११ वाहने जप्त करण्यात आली आहे. सिडकोच्या नियोजनातील त्रुटीमुळे कोपरखैरणेतील रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मागील दहा वर्षात चाळीचे रूपांतर तीन मजली घरांमध्ये झाल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. तर आर्थिक प्रगतीमुळे घरोघरी वाहनांचीदेखील संख्या वाढत आहे. मात्र ही वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ती खेळाच्या मैदानात उभी केली जात आहेत. याचा त्रास तरुणांच्या मैदानी खेळांवर होत आहे. तसेच, मैदानाच्या डागडुजीवर होणार खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करून मैदाने मोकळी करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार पालिकेने खेळाच्या मैदानांमध्ये उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कोपरखैरणे परिसरात ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याचे विभाग अधिकारी अशोक मढवी यांनी सांगितले. त्यापैकी ३५ वाहनांवर कारवाई करून कारवाई शुल्क स्वरूपात एकूण १७ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तर ११ वाहने जप्त करून ती जमा करून घेण्यात आली आहेत. त्याशिवाय बेवारस स्थितीत उभ्या असणाऱ्या २५ वाहनांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसात ही वाहने संबंधितांनी न हटवल्यास ती जप्त केली जाणार आहेत. जप्त केलेली ही वाहने ठेवण्यासाठी वापरात नसलेल्या महापे येथील डेपोच्या जागेचा वापर होणार आहे.

शहर स्वच्छतेसाठी पालिकेची पावलेशहर स्वच्छतेच्या दृष्टीने पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. त्यात अनधिकृत बॅनरबाजीलाही आळा घातला जाणार आहे. शहरात विनापरवाना झळकणारे अथवा मुदत संपूनही तसेच असणारे बॅनर हटवले जाणार आहेत. तशा सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व विभाग कार्यालयांना केल्या आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई