शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी तत्काळ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 05:18 IST

तुर्भे रेल्वे स्थानकात फलाटावर तरुणीचा विनयभंग होत असल्याची घटना नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीवर पाहून सतर्क रेल्वे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करण्याची घटना गुरुवारी घडली.

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्थानकात फलाटावर तरुणीचा विनयभंग होत असल्याची घटना नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीवर पाहून सतर्क रेल्वे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करण्याची घटना गुरुवारी घडली.तक्रारदार २१ वर्षीय तरुणी सकाळी साडेअकरा वाजता ठाण्याकडे जाणाºया लोकलच्या प्रतीक्षेत फलाट क्रमांकदोनवर उभी असताना पाठीमागूनआलेल्या आरोपीने तिला मिठी मारून विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने स्वत:ला सावरत आरोपीलाधक्का देत दूर ढकलले. यानंतर आरोपी तेथून निघून गेला.हा प्रकार घडत असतानाही फलाटावर उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी कुणीही तिच्या मदतीला पुढे सरसावले नाही. हा प्रकार आरपीएफचे कॉन्स्टेबल नीलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी स्थानकातील आरपीएफ कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात मॉनिटरवर पाहिला. त्यांनी ही बाब रेल्वे पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या तरुणीकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.पोलिसांनी त्वरित पाठलाग करून आरोपीला सबवेमध्ये ताब्यात घेतले. नरेश के. जोशी (४२) असे आरोपीचे नाव असून, तो घणसोलीचा राहणारा आहे. त्याच्याविरोधात वाशी रेल्वे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. त्याने यापूर्वी कोणासोबत असे प्रकार केले आहेत का, याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोºहे यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक लोकेश सागर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेचा आढावा घेतला. या वेळी आरोपी अटक असल्याची माहिती पोलिसांनी वेळीच उघड न केल्याच्या कारणावरूनही त्यांनी तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले.तसेच अशा गुन्ह्यांमधील आरोपी न्यायालयातून सहज सुटत असल्याने आरोपी नरेश जोशीला सहज जामीन मिळू नये, यासाठी सरकारी वकिलांमार्फत प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी रेल्वे पोलिसांना केली.