शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त मुलांच्या राहण्याची इथे होणार सोय; खारघरमध्ये उभारणार १२ मजली इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2023 09:24 IST

गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण उपचारांसाठी टाटा रुग्णालयाची वाट धरतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाइकांची राहण्याची सोय हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा कळीचा मुद्दा आहे. रुग्णालय परिसरात उपलब्ध धर्मशाळांमध्येही रुग्णाच्या नातेवाइकांना राहण्यासाठी जागा नसते. त्यामुळे अनेकदा त्यांना फुटपाथवर वा पुलाखाली पथारी मांडावी लागते. मात्र, आता खारघर येथे कॅन्सरग्रस्त मुले आणि त्यांच्या नातेवाइकांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असून याकरिता १२ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी २२६ कुटुंबे या इमारतीत राहू शकणार आहेत.

गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण उपचारांसाठी टाटा रुग्णालयाची वाट धरतात. उपचारांसाठी अनेक महिने लागतात. अशावेळी गरीब रुग्णांना राहण्यासाठी धर्मशाळेशिवाय पर्याय नसतो. मात्र, रुग्णसंख्या मोठी असल्याने या धर्मशाळाही अपुऱ्या पडतात. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ॲक्ट्रेक) हा दुसरा मोठा परिसर असून या ठिकाणीही रुग्णांना उपचार दिले जातात. याच ठिकाणी कॅन्सरग्रस्त मुले व त्यांच्या नातेवाइकांसाठी १२ मजल्यांची इमारत उभारली जात आहे. या इमारतीच्या देखभाल व उभारणीसाठी लागणारा खर्च सेंट ज्यूड्स इंडिया चाइल्ड केअर सेंटर या संस्थेतर्फे केला जाणार आहे. ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, टाटा मेमोरियल सेंटर आणि सेंट ज्यूड्स चाइल्ड केअर सेंटरतर्फे कॅन्सरग्रस्त मुलांची उच्च दर्जाची काळजी घेतली जाईल. 

 

खारघर येथील जागा लहान मुलांच्या दृष्टीने खूप चांगली असून, या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी त्याच्या राहण्याबरोबर कॅन्सरग्रस्त मुलांना खारघर येथून टाटा रुग्णालयात ने-आण करण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांचे शिक्षण, समुपदेशन, जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात येणार आहे. लवकरात लवकर ही इमारत आम्ही उभी करण्याच्या प्रयत्नात आहोत. - निहाल कवीरत्ने, सहसंस्थापक, सेंट ज्यूड्स इंडिया चाइल्ड केअर सेंटर

टॅग्स :cancerकर्करोग