बिरवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील चांढवे गावाच्या हद्दीत सुमो गाडी झाडावर आदळून १० जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील चांढवे गावच्या हद्दीमध्ये चालकाला डुलकी लागल्याने टाटा सुमो झाडावर आदळून चालक विनायक कोंडविलकर, सिद्धी कोंडविलकर, प्रियंका सावरटकर, सुनील सावरटकर, श्रेयस खेडेकर, सचिन खेडेकर, वामन खेडेकर, वैशाली खेडेकर, पार्थ खेडेकर, माधुरी मंगेश भुतकर हे जखमी झाले आहेत.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद आहे. चातक विनायक कोंडविलकर टाटा सुमो एमएच २३/ई ९२३५ ही घेवून गणपतीपुळे ते मुंबई असे जात असताना त्यांना झोप लागल्याने गाडी झाडावर आदळून अपघात झाला. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (वार्ताहर)
चांढवे गावाजवळ अपघात
By admin | Updated: December 22, 2015 00:38 IST