शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या कामामुळे अपघात

By admin | Updated: January 10, 2017 06:54 IST

सायन पनवेल महामार्गावरील कामोठे पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.

वैभव गायकर / पनवेलसायन पनवेल महामार्गावरील कामोठे पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. यामुळे कामोठेती रहिवाशांना सुमारे दीड किलोमीटरपेक्षा जास्त वळसा घालून वसाहतीत यावे लागते. सीआरझेडच्या परवानगी न मिळाल्याने येथील रस्त्याचे काम रखडल्याचे बोलले जात आहे. रखडलेल्या कामांमुळे याठिकाणी अनेक अपघात होत आहेत. बुधवारी सकाळी डालड्याचे डब्बे वाहून नेणाऱ्या टॅकरला याठिकाणी अपघात झाला.महामार्गावर प्रवेश करताना अनेक चालक उलट्या दिशेने वाहन चालवून महामार्गावर प्रवेश करतात. मुंबईकडे जाणारी वाहने याच मार्गावरून वेगाने जात असून याचठिकाणी बस स्थानक व अनेक गाड्याचा थांबा आहे. अनेकदा उड्डाणपुलावर चढतानाही वाहनांचे अपघात होतात. सीआरझेडच्या कचाट्यात अडकलेले हे रस्त्याचं काम  सुरु करण्यासाठी कामोठेवासियांनी सह्यांची मोहीम राबविली. मोर्चा काढण्याचाही निर्धार केला मात्र अद्याप रस्त्याचे काम अपूर्णच राहिले आहे.  पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी  देखील यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊन रस्त्याचे काम सुरु करण्याचे प्रयत्न केले  मात्र संबंधित खात्याकडून दुर्लक्ष होत असल्याने अद्याप हा रस्त्याचे काम सुरु झालेले नाही.