शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कर्जत-कल्याण मार्गावर गतिरोधकांमुळे अपघात!

By admin | Updated: June 2, 2016 01:38 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरु आहे. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन अपघातही घडत आहेत. एमएमआरडीएने या गतिरोधक टाकणाऱ्यांवर लवकर कारवाई करून ज्या ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता नाही असे गतिरोधक काढण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान सुमारे ३०ते ३५ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक हे कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होत आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे, परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांना पडला आहे. कोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.काही दिवसांपूर्वी याच राज्य मार्गावर शेलू, नेरळ व देऊळवाडी येथे टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. हे गतिरोधक असे आहेत की समोर आल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होतो. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जेथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधक लवकरात लवकर काढण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)कर्जत-कल्याण रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता अनेकांनी जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत ते काढण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही नेरळ, कर्जत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस संरक्षणासाठी पत्र दिले आहे. पोलिसांचे उत्तर मिळताच लगेच अनावश्यक ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात येतील. - विनय सर्वे, उप अभियंता, एमएमआरडीएकर्जत-कल्याण राज्यमार्गावर आवश्यकता नसतानाही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गतिरोधक टाकले आहेत. ज्या ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत तेथे पांढरे पट्टे ओढले नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे आवश्यकता नसेल अशा ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात यावेत, जेणेकरून अपघात होणार नाही.- किशोर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, डिकसळ