शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे घडताहेत अपघात

By admin | Updated: March 25, 2016 00:58 IST

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा

नवी मुंबई : रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, अनावश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर व कामातील त्रुटी यामुळे हे अपघात घडलेले आहेत.रुंदीकरणाच्या कामानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक अधिकच गतिमान झालेली आहे. या मार्गावरून प्रतिदिन शेकडो छोटी-मोठी वाहने मुंबई, नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने ये-जा करीत असतात. यावेळी सदर रस्त्यावर भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे अनेकांना अपघाताच्या घटनेशी सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी वाशी खाडीपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेला अज्ञात वाहनाने चिरडले होते. त्यानंतर रात्रभर या मृतदेहावरून छोटी-मोठी वाहने जात होती. त्यामुळे पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे पोलिसांना जमा करावे लागले होते. पुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे वाहनाच्या जेमतेम प्रकाशातच चालकांना वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अशाप्रकारच्या अनेक अपघातांची नोंद वाशी पोलिसांकडे होत आहे. शिवाय टोलनाक्यालगत पुलाच्या उताराला अनावश्यक ठिकाणी बसवलेला स्पीडब्रेकर व वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलाच्या कामातील त्रुटी यामुळेही अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. १० दिवसांपूर्वी एका तरुणाला मोटारसायकल अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. हा तरुण सानपाडा येथून मुंबईच्या दिशेने जात असताना पामबीच मार्गावरील पुलाच्या वाढीव कामातील त्रुटीचा तो बळी ठरला. पुलाच्या सुधारकामादरम्यान मार्गाचे दोन भाग जोडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र रेल्वेच्या रुळाप्रमाणे असलेल्या या लोखंडावर मोटारसायकल येताच चाक घसरून अपघात होत आहेत.अपघाताच्या या घटनांना आळा घालण्यासाठी सायन-पनवेल मार्गावरील त्रुटींमध्ये सुधार करून चालकांची गैरसोय दूर करण्याची गरज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार खाडीपुलावर पुरेशा प्रकाशाची सोय करून वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलातील त्रुटी दूर करण्याची गरज वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)वाशी पोलीस ठाणे हद्दीत सायन-पनवेल मार्गावर दीड ते दोन कि.मी. अंतरात होणाऱ्या अशा अपघातांमध्ये प्रतिवर्षी सुमारे १२ जणांचे प्राण जात आहेत. सन २०१४ मध्ये एकूण ६४ अपघात घडले असून त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये ६८ अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे.