शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत नगरसेवकपदांसाठी जोरदार रस्सीखेच...

By admin | Updated: June 4, 2017 03:49 IST

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. शेकाप महाआघाडीला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.

- वैभव गायकर। लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. शेकाप महाआघाडीला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. मात्र, पालिकेच्या ७८ जागांच्या संख्याबळानुसार पाच स्वीकृत नगरसेवक पालिकेवर जाणार आहेत. त्यानुसार पक्षीय बलाबल पाहिले असता, भाजपा ५१ आणि महाआघाडीला २७ जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार भाजपाला ३, तर महाआघाडीला २ स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडील कार्यकर्त्यांकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे, तिकीटवाटपा वेळी बंडखोरांना शांत करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन देण्यात आले होते. ते कार्यकर्तेदेखील या पदासाठी आस लावून बसले आहेत. साधरणत: १५ नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे. त्यानुसार भाजपाचे संख्याबळ पाहिले असता, त्यांच्या पारड्यात ३ स्वीकृत नगरसेवक पदे जाणार आहेत. तर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे संख्याबळ २७ असल्याने दोन स्वीकृत नगरसेवक महाआघाडीला सभागृहात पाठविता येणार आहेत. भाजपाने पालिकेवर एकहाती सत्ता मिळवत दिग्गजांना पराभवाची धूळ चारल्याने शेकापचे मात्तबर मंडळी या पदासाठी पक्ष नेतृत्वाकडे रेटा लावून आहेत. शेकापच्या वतीने या पदासाठी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरु नाथ गायकर, माजी नगरसेवक सुनील बहिरा, माजी नगरसेवक गणेश कडू, पत्रकार विवेक पाटील, सचिन ताडफळे, किशोर म्हात्रे आदींचे नाव चर्चेत आहेत. तर काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक निर्मला म्हात्रे व लतीफ शेख यांच्या नावाची चर्चा आहे. शेकाप महाआघाडीकडे स्वीकृत नगरसेवकपदाच्या केवळ दोन जागा उपलब्ध असताना इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षनेतृत्वदेखील संभ्रमात आहेत. खारघरसारख्या शहरी भागात पक्ष टिकवून ठेवायचा असल्यास स्वीकृत नगरसेवकाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकल्यास खारघरमध्ये शेकाप टिकून राहील, असादेखील एक सूर शेकापमधून बाहेर पडत आहे. तर तिकीटवाटपात काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला आकडता हात घ्यावा लागला होता. मात्र, स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत शेकापने उदारता दाखवावी, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटातून सुरू आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपाच्या वतीनेदेखील स्वीकृत पदांसाठी नावाची लांबलचक यादी आहे. यामध्ये सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले जयंत पगडे, खारघर शहर भाजपाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अनिल भगत, नितीन पाटील, भीमराव पोवार यांच्या नावांची चर्चा आहे.