शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

महागड्या तिकिटामुळे एसी लोकल रिकाम्या; प्रशासनाविरोधात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:20 IST

ट्रान्स हार्बरवरील साध्या लोकलच्या फेऱ्या नियमित करण्याची मागणी

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलच्या महागड्या तिकिटामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली असून, एसी लोकल रिकाम्याच धावत आहेत. या मार्गावर नियमित धावणाºया साध्या लोकलच्या सुमारे १६  फेऱ्या रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. साध्या लोकलच्या फेºया पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

रेल्वे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ट्रान्स हार्बर मार्गावर ३० जानेवारीपासून एसी लोकल सुरू करण्यात आली. उद्घाटनानंतर प्रत्यक्षात एसी लोकलच्या फेऱ्या ३१ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या. पनवेल, नेरु ळ आणि वाशी या रेल्वे स्थानकांवरून ठाणे एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. साध्या लोकलने किमान अंतरावरील प्रवासासाठी पाच रु पयांचे तिकीट आकारले जाते. एसी लोकलने त्याच प्रवासासाठी सुमारे ७० रु पये तिकीटदर ठेवण्यात आला आहे.

ठाणे ते पनवेल मार्गासाठी १८५ रु पये तिकीटदर आकारले जात आहेत. एसी लोकलच्या प्रवासासाठी भरमसाठ तिकीटदर आकारले जात असल्याने, सर्वसामान्य प्रवाशांनी एसी लोकलच्या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. एसी लोकल सेवा सुरू केल्यापासून या लोकलने सरासरी आठ ते दहा प्रवासी प्रवास करीत असून, इतर शेकडो सामान्य प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी आणि सायंकाळी नियमित असलेल्या साध्या लोकलच्या फेºया बंद करून एसी लोकलच्या  फेऱ्या सुरू केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे स्थानकांवर साध्या लोकलसाठी प्रवाशांची गर्दी होत असून, साध्या लोकलच्या नियमित फेºया सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावर साध्या लोकलच्या वेळेत एसी लोकल चालवू नये, इतर वेळेत चालवाव्यात, अशी मागणी अनेक प्रवासी करीत आहेत. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.- सुदर्शन खुराणा, नेरु ळ रेल्वे स्थानक, प्रबंधक

रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावर साध्या लोकलच्या काही फेºया रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. एसी लोकलचे तिकीटदर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. सामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून, प्रशासनाने साध्या लोकलच्या वेळेत एसी लोकल चालवू नयेत.- अजिंक्य पालकर, प्रवासी

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेHarbour Railwayहार्बर रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेlocalलोकलNavi Mumbaiनवी मुंबई