शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फरार गावंडच्या आवळल्या मुसक्या, मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 14, 2023 13:43 IST

मागील दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

नवी मुंबई : सुमारे 400 कोटीच्या चिटफंड प्रकरणात अटकेत असताना जामीन मिळवून फरार झालेल्या सतीश गावंडला अखेर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. मागील दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

पनवेल, उरण परिसरातील नागरिकांना चिटफंडच्या माध्यमातून 400 कोटीहून अधिक रकमेचा गंडा घातल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली आहे. याप्रकरणी एका चिटफंडची प्रमुख सुप्रिया पाटील व तिचे सहकारी पोलिसांच्या अटकेत आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यातील चिटफंडचा प्रमुख सतीश गावंड उर्फ सुमित पटेल याला अटक केल्यानंतर त्याने न्यायालयातून जामिन मिळवून धूम ठोकली होती.

यादरम्यान त्याने व्हिडीओ वायरल करून या प्रकरणात इतरही काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे संकेत दिले होते. शिवाय गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळतील असे आमिषही तो दाखवत होता. यामुळे काही गुंतवणूकदारांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. दरम्यान पोलिसांनी सतीश गावंड व सुप्रिया पाटील यांची संपत्ती जप्त करण्यावर जोर दिला आहे.

दोघांची सुमारे 100 कोटींची संपत्ती अद्याप पर्यंत पोलिसांनी जप्त केली आहे. तर फरार असलेल्या गावंडच्या शोधासाठी देखील विविध पथके तयार केली होती. त्यामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने शुक्रवारी रात्री उशिरा त्याला मध्यप्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. शनिवारी त्याला नवी मुंबईत आणण्यात आले. त्याच्या अटकेनंतर या गुन्ह्यातली इतरही आवश्यक माहिती पोलिसांसमोर उघड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिस अधिक तपास करत आहेत.