शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना; महापालिकेची १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:52 IST

मोबाइल ॲपवरही विशेष लिंक देण्यात येणार आहे. ‘अभय योजना’ राबविताना थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकीदारांना सौजन्यपत्रे दिली जाणार आहेत. 

नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीदरम्यान ही योजना असणार असून, थकबाकीदारांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे अनेकांना मालमत्ता कर भरता आलेला नाही. ज्या व्यवसायिक व निवासी मालमत्तांचे कर अनेक वर्षांपासून थकले आहेत, त्यांच्या व्याजाची व दंडाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे पालिकेने मालमत्ता करामध्ये सूट द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघासह अनेक लोकप्रतिनिधींनी केली होती. याची दखल घेऊन आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. १५ डिसेंबरपासून १५ फेब्रुवारीपर्यंतच  ही योजना आहे. या कालावधीमध्ये थकबाकीदारांनी कराची संपूर्ण रक्कम भरली व दंडापैकी २५ टक्के रक्कम भरली तर त्यांना उर्वरित ७५ टक्के दंडात्मक रकमेमध्ये सूट दिली जाणार आहे. सर्व रक्कम एकाच वेळी भरावी लागणार आहे. टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही. या योजनेसाठीची माहिती मनपाच्या संकेतस्थळावर व ८ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. मोबाइल ॲपवरही विशेष लिंक देण्यात येणार आहे. ‘अभय योजना’ राबविताना थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकीदारांना सौजन्यपत्रे दिली जाणार आहेत. 

महानगरपालिकेची दुसरी अभय योजनामहानगरपालिका आयुक्तांनी दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. यापूर्वी १३ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने चार महिन्यांसाठी अभय योजना लागू केली होती. त्या वेळी शहरात १ लाख ४५ हजार ८८७ मालमत्ताधारकांकडे २१०० कोटी रुपये थकले होते. ७,५६४ जणांकडे १ लाखापेक्षा जास्त थकबाकी होती. यानंतर मनपाने पुन्हा एकदा थकबाकीदारांना संधी दिली आहे.

मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून त्यामधूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्तता केली जात आहे. अभय योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर कर भरणा करून शहर विकासात योगदान द्यावे. - अभिजित बांगर, आयुक्त, महानगरपालिका