शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हॉटेलबाहेरील पानटपऱ्यांना अभय सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:18 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : चोरून विजेचा वापर, लाखो रुपयांची उलाढाल, कारवाईचा फक्त दिखावाच

नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील सर्व हॉटेलच्या बाहेर अनधिकृतपणे पानटपºया सुरू करण्यात आल्या आहेत. हॉटेलचालक प्रत्येकाकडून पाच ते २५ हजार रुपये जागाभाडे वसूल करत आहेत. बिनधास्तपणे सुरू असलेल्या अनधिकृत व्यापारास महापालिका पाठीशी घालत असून, त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. सर्व ठिकाणी चोरून विजेचा वापर सुरू असून महावितरणचे अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये काही दिवसांपूर्वी शहरातील अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. शहरातील बहुतांश सर्व हॉटेलच्या बाहेर सार्वजनिक वापराच्या जागेवर अनधिकृतपणे पानटपरी सुरू करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी हॉटेलचालकांनीही ही जागा भाडेतत्त्वावर पानटपरीचालकांना देण्यात आली आहे. प्रत्येक पानटपरीकडून कमीत कमी पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. जेवढा व्यवसाय जास्त तेवढे भाडेही जास्त आकारले जात आहे. संबंधितांना हॉटेलमधूनच अनधिकृतपणे वीजजोडणी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला लागूनच विजेची चोरी असून त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. रोडला लागून नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू असून, सार्वजनिक अनेक जण धूम्रपान करत असतात. याचा त्रास हॉटेलजवळून ये -जा करणाºया नागरिकांना होत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाशी सेक्टर १७ मधील नवरत्न हॉटेलच्या बाहेरही मोक्याच्या ठिकाणी पानटपरी सुरू आहे. महापालिका आयुक्तपदावर अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पानटपºयांवरही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान नवरत्न हॉटेल बाहेरील टपरीही उचलण्यात आली होती; परंतु १५ दिवसांमध्ये तेथील व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आला. शहरातील इतर ठिकाणच्या पानटपºयाही पूर्ववत सुरू करण्यात आल्या. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ५०० पेक्षा जास्त अनधिकृत पानटपºया आहेत. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर एक टपरी असून, सर्वच ठिकाणी विजेची चोरी सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयाजवळील सर्व हॉटेलच्या बाहेर पानटपरी आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या विभागीय कार्यालयाला लागूनही हा व्यवसाय असून, तेथेही चोरून विजेचा वापर केला जात आहे. कार्यालयाच्याबाहेरच सुरू असलेल्या वीजचोरीकडेही महावितरणचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. महापालिकेने यापूर्वी काही ठिकाणी कारवाई केली होती; परंतु कारवाई सुरू केली की संबंधित व्यावसायिकांकडून दबाव आणून कारवाई बंद पाडली जात आहे. यामुळे नागरिकांनी तक्रारी करूनही हे व्यवसाय बंद होत नाहीत.अभियानादरम्यान टपºया बंदच्स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईमध्ये आले होते.च्हे पथक ज्या परिसराला भेट देणार आहे, त्या परिसरातील पानटपºया बंद ठेवण्यात आल्या होत्या.च्महापालिका प्रशासनाने सीवूडमध्ये अधिकृत दुकानामध्ये सुरू असलेले पान, तंबाखू, सिगारेट विक्रीचे दुकान बंद ठेवायला लावले होते. सर्वेक्षण पूर्ण होताच व्यवसाय पुन्हा सुरू झाला.वीजचोरांना अभय का?च्हॉटेलबाहेरील सर्व पानटपºयांसाठी चोरून विजेचा वापर केला जात आहे. शहरात ५०० पेक्षा जास्त ठिकाणी बिनधास्तपणे वीजचोरी सुरू आहे.च्नवरात्रोत्सव व गणेशोत्सवामध्ये दहा दिवसांसाठीही मंडळांना स्वतंत्र वीजमीटर घेणे बंधनकारक केले जाते.च्एखाद्या मंडळाने मीटर घेतला नाही तर त्यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जातो; परंतु पानटपरी चालक वर्षानुवर्षे चोरून विजेचा वापर करत असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही.कोणतीच परवानगी नाहीच्शहरातील हॉटेलच्या बाहेर पान, बिडी, तंबाखू विकणाºया व्यावसायिकांकडे कोणताही व्यावसायिक परवाना नाही. महापालिकेचा परवानाही घेतलेला नाही.च्जागा भाडेतत्त्वावर घेतल्याचा करारनामाही नाही. सार्वजनिक वापराची जागा दुसºयांना भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार हॉटेलचालकांना कोणी दिला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.