शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पळस्पे फाटा हद्दीच्या वादात अनधिकृत पार्किंगला अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:26 IST

मुंबई- गोवा महामार्ग : अवजड वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल :  मुंबई-गोवा महामार्गावर तसेच सर्व्हिस रोडवर सध्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांसह येथील स्थानिक ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पळस्पे फाटा परिसरात पनवेल शहर व नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दी विभागल्या गेल्या असल्याने कारवाई कोणी करायची, या प्रश्नामुळे अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांना अभय मिळाले आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे फाटा येथून पुढे कर्नाळा अभयारण्य परिसरापर्यंत ठिकठिकाणी अशाप्रकारची वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. विशेष म्हणजे पळस्पे गावाजवळ उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर अनेक जण सर्रास वाहने उभी करीत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. याच परिसरात असलेल्या जेडब्लूसीचे मोठे गोदाम असल्याने सतत अवजड वाहनांची ये-जा असते. ही वाहने थेट रस्त्यावरच अथवा सर्व्हिस रोडवर उभी करून ग्रामस्थांना अटकाव केल्याचा प्रयत्न केला जातो. पनवेल शहर वाहतूक पोलिसांची हद्द पळस्पे उड्डाणपुलापर्यंत आहे तर त्यापुढील हद्द ही नवीन पनवेल वाहतूक पोलिसांची आहे. अनेक वेळा तक्रार केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून हद्दीचे कारण पुढे केले जात आहे. या ठिकाणी वाढत चाललेल्या त्रासातून सुटका करण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

कारवाई होत नसल्याने तक्रार नाही  कित्येक वर्षे याठिकाणचे बेकायदेशीर पार्किंग ग्रामस्थांची डोकेदुखी ठरली आहे. कारवाई होत नसल्याने आम्ही याबाबत तक्रार करणे सोडून दिल्याचे मत  काही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. 

कारवाई करण्याचे आश्वासन पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या अनधिकृत पार्किंगसंदर्भात नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना यापूर्वीही नोटिसा दिल्या गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पनवेल शहर वाहतूक शाखेच्या अखत्यारित येणाऱ्या हद्दीत अनधिकृत पार्किंगवर कारवाई केली जाईल, असे पनवेल शहर वाहतूक शाखेचे अभिजित मोहिते यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई