शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे आधारकार्ड, टोळीचा भांडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:22 IST

बनावट शासकीय ओळखपत्रे बनवून देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : बनावट शासकीय ओळखपत्रे बनवून देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट १३ निवडणूक ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याआधारे संबंधितांना आधार कार्ड बनवून दिल्याचेही उघड झाले आहे.बनावट आधार कार्ड बनवणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मोटारवाहन चोरी शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांनी सहायक निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक योगेश वाघमारे आदीचे पथक तयार केले होते. त्यांना बोनकोडे येथील एक एजंट बनावट आधार कार्ड बनवून देत असल्याची माहिती मिळाली. यानुसार त्यांनी बनावट ग्राहक तयार करून मोहम्मद आझाद (२९) याच्याशी संपर्क साधला होता. या वेळी त्याने सदर बनावट ग्राहकाला बनावट निवडणूक ओळखपत्र बनवून दिले. त्यानंतर दुसरा साथीदार रोहितकुमार यादव (२९) याने बनावट आधार कार्डसाठी बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे प्रक्रिया केली. याच वेळी पोलिसांनी त्यांना पकडले असता, त्यांच्याकडे १३ बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळून आली. त्यांनी अनेक व्यक्तींना भारतात वास्तव्याचा कोणताही आवश्यक पुरावा नसतानाही बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे आधार कार्ड बनवून दिल्याचे उघड झाले. त्यामध्ये बांगलादेशी अथवा इतर देशाबाहेरील व्यक्तींचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १८ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.रोहितकुमार यादव हा तुर्भेचा राहणारा असून, पूर्वी तो आधार सेंटर चालवायचा. सध्या तो आधार काढण्यासाठी लागणाºया मशिन पुरवायचे काम करतो. यामुळे बहुतांश आधार सेंटरवर त्याच्या ओळखी आहेत. याच ओळखीचा फायदा घेऊन कोणत्याही चौकशीशिवाय बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण करायचा. यानुसार या दुकलीने मोठ्या प्रमाणात गैरपद्धतीने आधार कार्ड काढून दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.