शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दारातून परत आलेल्या ८४ जणांचे मतदान

By नामदेव मोरे | Updated: May 13, 2024 20:16 IST

सील आश्रमातील रुग्णांमध्ये उत्साह : लोकशाहीच्या उत्सवामध्ये घेतला सहभाग : प्रशासनाचे मानले आभार

नवी मुंबई : दुर्धर आजार व मानसीक स्वास्थ्य हरवल्यामुळे रोडवर भटकत असलेल्या रुग्णांचे पुनर्वसन करण्याचे काम पनवेलमधील सील आश्रमाच्यावतीने केले जाते. अनेकांची मृत्यूच्या दारातून सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांपैकी ८४ जणांनी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासनाचे सर्वांनी आभार मानले आहेत.

पनवेल तालुक्यातील वांगणी येथे सील आश्रम मनोरुग्णांवरील उपचार व पुनर्वसनासाठीचे काम करत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रेल्वे स्टेशन, बस स्टँडसह रोडवर फिरणारे मनोरुग्ण, अजारी रुग्णांना आश्रमात आणून त्यांच्यावर उपचार केले जातात. आतापर्यंत शेकडो नागरिकांना त्यांच्या कुटुूंबियांशी भेट घडवून आणली आहे. ज्यांच्या कुटुंबियांचा शोध लागत नाही त्यांचा मृत्यूपर्यंत आश्रमात सांभाळ केला जातो. सद्यस्थितीमध्ये आश्रमात २७५ जणांचा सांभाळ केला जात आहे. रायगडच्या जिल्हाअधिकारी पदावर निधी चौधरी तहसीलदार पदावर विजय तळेकर असताना त्यांनी आश्रमातील नागरिकांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी ८९ नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव आले होते.

मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सील आश्रमातील ८४ जणांनी दिवसभरात मतदान केले. जिल्हा परिषद शाळा वांगणीमध्ये हे मतदान करण्यात आले. यामधील अनेकांची मृत्यूच्या दारातून सुटका झालेली आहे. गंभीर अजार, हरवलेले मानसीक स्वास्थ्य यामधून बाहेर पडून या सर्वांनी लोकशाहीच्या उत्साहात सहभाग घेतला. मतदानाचे कर्तव्य बजावता आल्याबद्दल या नागरिकांनी आश्रमाचे संस्थापक के एम फिलीप, बिजू सॅम्युअल यांच्यासह प्रशासनाचे आभार मानले आहेत. मरण्यासाठी सोडले होतेसील आश्रमातील मतदान करणाऱ्या ८४ पैकी अनेकांना मरण्यासाठी सोडण्यात आले होते. शरिरामधील जखमांमध्ये किडे झाले होते. अनेक गंभीर अजार झाले होते. नाव व स्वत:विषयी काहीही आठवत नसलेल्या या सर्वांना आश्रमात आणून त्यांच्यावर योग्य उपचार केले. या सर्वांचे आरोग्य आता सुधारले असून यापैकी अनेकांनी पहिल्यांदाच मतदानाच हक्क बजावला. मतदान करता आल्याबद्दल आनंदही अनेकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई