शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणेच्या नावाखाली माथाडी कायदा नामशेष करण्याचा डाव; बंदचा इशारा

By नामदेव मोरे | Updated: December 4, 2023 16:01 IST

१४ डिसेंबरला राज्यव्यापी लाक्षणिक बंद; विधेयका विरोधात माथाडी संघटना आक्रमक

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली कायदाच रद्द करण्याचा डाव आखला जात आहे. शासनाच्या विधेयकाविरोधात राज्यातील प्रमुख कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. १४ डिसेंबरला राज्यव्यापी बंद आयाेजीत केला आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र लढा उभारण्याचा इशारा माथाडी कायदा बचाव कृती समितीने दिला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये आयोजीत कृती समितीच्या बैठकीमध्ये शासनाला इशारा देण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. सर्वसामानय श्रमजीवींनी न्याय देणारा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या या कृतीला आमचा विरोध आहे. १४ डिसेंबरला एक दिवसाच्या आंदोलनामध्ये सर्व संघटना सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही सुधारणेच्या नावाखाली कायदा नामशेष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांना कामगार संघटनांच्या सुचनांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे आंदोलन केले जाणार आहे. सरकारने याची योग्य दखल घेऊन चर्चा करून तोडका काढला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांनीही प्रस्तावीत विधेयकावरील संयुक्त चिकीत्सा समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तरीही सरकारी घाईगडबडीत हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याची शक्यता आहे. सुधारणेच्या नावाखाली कायदाच रद्द करण्याचा डाव आहे. कायदा वाचविण्यासाठी सर्व प्रमुख संघटना एकत्र झाल्या असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे आंदोलन केले जाणार आहे. या बैठकीला कामगार नेते अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, एकनाथ पवार, शिवाजी सर्वे, सतीश जाधव, निवृत्ती धुमाळ यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

युनीस्कोनेही गौरव केलेला माथाडी कायदा मोडीत काढण्याचा डाव आहे. सरकारच्या धोरणाविरोधात १४ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.-बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. कामगार मंत्री कामगारांच्या विरोधात भुमीका घेत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.-नरेंद्र पाटील, माथाडी नेते

संयुक्त चिकीत्सा समितीचा अहवाल येण्यापुर्वीच सरकार घाईमध्ये विधेयक आणण्याची शक्यता आहे. माथाडी कायदा रद्द करण्यास आमचा विरोध असून सरकारला इशारा देण्यासाठी आंदाेलन केले जात आहे.-शशिकांत शिंदे, माथाडी नेते

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई