शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त भाजीपाल्यासाठी शेतकरी बाजारचा पर्याय; आठवडे बाजारांच्या प्रसिद्धीकडेही शासनाचे दुर्लक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:44 IST

शेतकरी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शासनाने १२ ऑगस्ट २०१६ मध्ये संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरू केले.

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला, फळे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत शिराेमणी सावता माळी आठवडे शेतकरी बाजार योजना सुरू केली. मुंबई, नवी मुंबईमध्येही बाजार सुरू झाले. त्याचा लाभ ग्राहकांना होत आहे; परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात या बाजारांची संख्या कमी आहे. कुठे कधी बाजार भरणार याविषयी शासनाकडून प्रसिद्धीही केली जात नसल्यामुळे या आठवडे बाजारांचा अपेक्षित लाभ होत नाही.

शेतकरी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शासनाने १२ ऑगस्ट २०१६ मध्ये संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरू केले. पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, पुणेमध्ये प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस आठवडे बाजार भरविण्याचे निश्चित केले. नवी मुंबईमध्ये सीवूड, एनआरआय, सेक्टर १५ बेलापूर, राजीव गांधी मैदान व वाशी अशा पाच ठिकाणी आठवडे बाजार भरविला जात आहे. या उपक्रमाला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. इतर मार्केटपेक्षा कमी दरात भाजीपाला उपलब्ध होत आहे; परंतु आठ विभाग कार्यालयांपैकी २ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रामध्येही आठवडे भरत आहे. उर्वरित ६ विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये अद्याप ही योजना पोहोचलेली नाही. मुंबईमध्येही ६ ठिकाणी आठवडे बाजार सुरू केला आहे; परंतु या दोन्ही शहरांची व्याप्ती पाहता हे बाजारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

शेतकरी आठवडे बाजार पूर्वी पणन मंडळाच्या माध्यमातून चालविला जात होता. आता हा उपक्रम कृषी विभागाकडे वर्ग केला असल्याची माहिती पणन विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली. आठवडे बाजारच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त दरात कृषिमाल उपलब्ध करून देणे शक्य आहे; परंतु बाजारांची संख्या वाढविली जात नसल्यामुळे चांगली योजना असून प्रत्यक्षात महागाई कमी करण्यासाठी त्याचा फारसा उपयाेग होताना दिसत नाही.

बाजार समितीमध्येही स्वस्त विक्रीची सोयमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होलसेलसोबत किरकोळ भाजीपाला विक्रीही सुरू केली आहे. येथील ‘डी-विंग’मध्ये किरकोळ विक्रीची सोय आहे. मुंबई, नवी मुंबईमधील इतर किरकोळ मार्केटपेक्षा २५ ते ३० टक्के कमी दराने येथे भाजीपाला उपलब्ध होत आहे. या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबईमधून ग्राहक खरेदीसाठी येत असतात; परंतु या व्यापाराला अधिकृत मंजुरीच नाही.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर व वाशी विभागात शेतकरी बाजार सुरू आहे. या उपक्रमासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे विविध विभागांत अर्ज आले व तेथे जागेची उपलब्धता होत असेल व वाहतुकीसह इतर समस्या निर्माण होणार नसतील तर परवानगी देता येईल.- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त बाजार समिती.ष