शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पामबीचवर ९,३९८ चालकांनी तोडली वेगमर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 13:02 IST

आरटीओची कारवाई : दीड वर्षात अनेकदा राबविली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : उपप्रादेशिक परिवहन विभागाने पामबीच मार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ९ हजार ३९८ वाहनांवर कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२१ पासून ते एप्रिल २०२३ दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही पामबीच मार्गावर अतिवेगाने वाहने पळवली जात असल्याचे पहायला मिळत आहे.

नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून पामबीच मार्गाला ओळखले जाते. भुरळ घालणाऱ्या या मार्गावर वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अनेकदा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. 

 अनेकदा भरधाव वाहनचालकांकडून सिग्नल तोडल्यानेदेखील अपघात घडले आहेत. तर काही अपघात भरधाव वाहनाच्या आडवे दुसरे वाहन आल्यानेदेखील घडले आहेत. यावरून सर्वाधिक अपघात हे वेगमर्यादा ओलांडल्याने घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर ६०ची वेगमर्यादा राखण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक खासगी कार, दुचाकी यांच्याकडून वेगमर्यादा तोडली जात आहे.  त्यातच काही परवानगी नसलेल्या बसदेखील पामबीच मार्गावरून उघडपणे सुसाट धावत आहेत. त्यामुळे भविष्यात एखाद्या अपघातामध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तीचे प्राण जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 कॅमेराच्या मदतीने वेगावर लक्ष       नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील दीड वर्षात तब्बल ९ हजार ३९८ वाहनचालकांवर केवळ वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. येत्या काळात पामबीच मार्गावर बसवल्या जाणाऱ्या स्पीड कॅमेराच्या मदतीने या कारवाया केल्या जाणार आहेत. त्यामुळे २४ तास पामबीच मार्गावरील वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे.     पामबीच मार्गावर मागील काही महिन्यांत वाहनचालकांनी वेग मर्यादा ओलांडल्याने अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या वाहनचालकांच्या वेग मर्यादेला आवर घालणे गरजेचे होते.