प्राची सोनवणे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. नवी मुंबईचा निकाल ९४.३० टक्के इतका लागला आहे. वाशी येथील फादर एग्नेल ज्युनिअर कॉलेजची अपूर्वा नार्वेकर हिला ९५.८५ टक्के तर पनवेलमधील महात्मा कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील वेदिता ठकेकरला ९४.९२ टक्के मिळाले आहे. शहरातील ६४ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर शहरातील सायबर कॅफे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आवारात मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांर्नी गर्दी केली होती. बारावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईतील एकूण १३,६७४ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी १२,९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६५३ इतकी असून प्रथम श्रेणीमध्ये ५९५३, द्वितीय श्रेणीत ४५८५ आणि उत्तीर्ण श्रेणीत १७१५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीचा निकाल मंगळवारी लागला. पनवेल तालुक्यातील मुलींनी मुलांना पुन्हा एकदा मागे टाक त बाजी मारली आहे. पनवेलचा निकाल ९२.५० टक्के लागला आहे. फेब्रुवारी २०१७रोजी पार पडलेल्या परीक्षेत पनवेल विभागातून एकूण ९१५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८४६९ एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण ८९.४७ टक्के मुले तर ९२.२२ टक्के मुली उत्तीर्ण होऊन आघाडीवर आहेत. पनवेल तालुक्यातील सेंट जोसेफ हायस्कूल कळंबोली व रामशेठ ठाकूर विद्यालय खारघर यांचा १०० टक्के निकाल लागला आहे, तर पनवेलमधील नामांकित महाविद्यालयांना मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये व्ही.के. हायस्कूल पनवेल ९४.२२ टक्के, याकूब बेग ८०.६४ टक्के, कोकण एज्युकेशन ९६.१५ टक्के, चांगू काना ठाकूर ९७.९८ टक्के , द. ग. तटकरे कळंबोली ९९.४२ टक्के, सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली ९५.२३ टक्के, सुषमा पाटील कामोठे ९६.८८ टक्के, केएलई कॉलेज कळंबोली ९८.७५ टक्के निकालाची नोंद झालेली आहे.
नवी मुंबईचा ९४.३०% निकाल
By admin | Updated: May 31, 2017 06:36 IST