शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल शहराचा देशात ८६ वा क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:40 IST

स्वच्छ भारत स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेला देशभरातून ८६ वा क्र मांक मिळाला आहे, तर राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत पनवेल शहर २५ व्या क्र मांकावर आहे.

पनवेल : स्वच्छ भारत स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेला देशभरातून ८६ वा क्र मांक मिळाला आहे, तर राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत पनवेल शहर २५ व्या क्र मांकावर आहे. मागील वर्षी पनवेल शहर देशभरात ८७ क्र मांकावर होते. यावर्षी पालिकेची वाटचाल एक क्र मांकाने पुढे आली आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत देशभरातील ४२३७ शहरे सहभागी झाली होती. पनवेल महानगरपालिकेची स्थापना नुकतीच दोन वर्षांपूर्वी झाली आहे. बाल्यावस्थेत असलेल्या पनवेल महानगरपालिकेसमोर प्रशासनाची घडी बसवणे, सिडको नोड हस्तांतर आदीसह ग्रामीण भागाला शहरांच्या तुलनेत मुख्य प्रवाहात आणणे हे प्रश्न आहेत. मागील वर्षीदेखील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेने भाग घेतला होता. मात्र, त्या वेळी केवळ ३० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावर्षी संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या एकूण ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आल्याने पनवेल महानगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत काही प्रमाणात सुधारणा केल्याचे दिसून येत आहे. कचरा व्यवस्थापनही यावर्षी पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात आले आहे. मागील वर्षी ते सिडको प्रशासनाकडे होते.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एमआयडीसी, एपीएमसी मार्केट, स्टील मार्केट, ग्रामीण भागाचा सहभाग आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामीण भाग अद्याप मागासलेला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत पालिकेने भित्तिचित्रे, कचरा व्यवस्थापन आदीवर काम केल्याने स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.>स्वच्छ सर्वेक्षणात आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षी केवळ ३० हेक्टर चौरस किलोमीटरमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची पाहणी झाली होती. यावर्षी संपूर्ण पालिका क्षेत्राचा सर्व्हे झाला, तरीदेखील मागील वर्षीच्या तुलनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत भविष्यात नक्कीच सुधारणा होतील.- गणेश देशमुख,आयुक्त,पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेल