ठाणे : शहरातील ब्रह्मांड परिसरातील ‘पायल ज्वेलर्स’च्या दुकानातून ८८ हजारांचे सोनेचांदीचे दागिने चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या दुकानाच्या दक्षिण बाजूकडील दुकान क्र. चारच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात शिरकाव केला. दुसऱ्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानातील काउंटर आणि शोकेसमधील प्रत्येकी एक हजाराच्या चार चांदीच्या फ्रेम, ४५ हजारांचे दोन ते तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने, नऊ हजारांची अर्धा किलो चांदी, २५ हजारांची सीसीटीव्ही यंत्रणा आणि पाटल्या असा ८८ हजारांचा ऐवज चोरण्यात आला. ही घटना २६ सप्टेंबरच्या रात्री ९ ते २७ सप्टेंबरच्या सकाळी ९ वा.च्या दरम्यान घडली. सहायक पोलीस निरीक्षक आर.के. धामणे तपास करीत आहेत.
ठाण्यात ज्वेलर्समधून ८० हजारांची चोरी
By admin | Updated: September 29, 2015 23:43 IST