शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यात ७७ अतिक्रमणे

By admin | Updated: November 22, 2015 00:25 IST

तालुक्यातील बेकायदेशीर बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्याचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम

पनवेल : तालुक्यातील बेकायदेशीर बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्याचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिक आले आहेत. दररोज नवनवीन बांधकाम व्यावसायिक उदयास येत असल्यामुळे पनवेल तसेच आजूबाजूच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणुकीचे प्रकारदेखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. तहसील विभागाने तालुक्यातील ७७ अनधिकृत बांधकामे शोधून काढली आहेत. त्यामुळे लवकरच ही सर्व ७७ बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील २३ गावांत नैना (सिडको) प्रकल्प येणार असल्यामुळे इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नैनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सिडकोने यातील बहुतांश बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम थांबविण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसींना केराची टोपली दाखवत बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम सुरूच ठेवले आहे.नेरे, कोप्रोली, विहिघर, चिपळे, सुकापूर, आकुर्ली, हरिग्राम, भानघर, कोळवडी, देवद, विचुंबे, आदई, शिवकर, वाजे, उमरोली, मोरबे, कामोठे आदी गावांमध्ये बांधकाम व्यावसायिक आल्यामुळे जमिनींना सोन्याचे भाव आले. अनेकांनी फिफ्टी-फिफ्टीच्या तत्त्वावर मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्यास दिल्या आहेत.पनवेल शहर तसेच सिडकोच्या हद्दीत जमीन शिल्लक नसल्याने आजूबाजूच्या गावात अनधिकृत बांधकाम सुरूच आहे.मात्र यातील बहुतांशी इमारतींना केवळ ग्रामपंचायतीकडून परवानग्या घेतल्या आहेत. सांडपाणी, वाहनतळ, कचरा आदी कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता बिल्डर गावागावात मोठमोठ्या बिल्डिंग उभारत आहेत.यातील काही अनधिकृत बांधकामे माजी सरपंचांचे असल्याचे समोर आले आहे.ठिकठिकाणी होर्डिंग आणि बॅनरबाजी करून इमारतीविषयी जाहिराती करण्यात येत आहेत. सरकारी बँकेचे लोन करून देतो, पाच मिनिटावर रेल्वेस्थानक अशा कितीतरी प्रकारच्या फसव्या जाहिराती करून लोकांना फसवले जात आहे. सामान्य लोकांनी स्वत:चे घर असावे म्हणून आपली आयुष्यभराची जमापुंजी घर घेण्यासाठी खर्च केली आहे तर काहींनी कर्ज घेऊन अनधिकृत इमारतींमध्ये घर बुक केले आहेत. मात्र त्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर निबंधक कार्यालयात दलालांच्या मार्फत सेटिंग लावून घरांचे रजिस्ट्रेशनही करण्यात येते. सहकारी बॅँकांच्या दलालांच्या मार्फत घरांवर लोन करून दिले जाते. लोन होत असल्याने ग्राहकही तांत्रिकदृष्ट्या जादा चौकशी करीत नाहीत, आणि येथेच ते फसतात. बहुतांशी बांधकामांना परवानगी न घेता बांधकाम केल्यामुळे सिडको ते केव्हाही पाडू शकते. या प्रकरणी काहींनी पोलीस स्टेशन व न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर तक्रारीही दाखल आहेत. (प्रतिनिधी)