शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींत ७५.२८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:51 IST

७० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क उरण : उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या ७० जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीसाठी ७५. २८ टक्के सरासरी मतदान झाले झाले होते. १६६ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले आहे. एका मतदान केंद्रावरील बंद पडलेल्या मतदान यंत्रांचा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.उरण तालुक्यातील चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, फुंडे, वेश्वी या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ७ वाजता चोख पोलीस बंदोबस्तात सहा ग्रामपंचायतींच्या ४३ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये मतदान करून कामावर जाण्याची घाई असलेल्या कामगारांची संख्या अधिक होती. या सहाही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडी असेच लढतीचे चित्र आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर आणून सोडण्यासाठी उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते सर्रास रिक्षा, दुचाकी वाहनांचा बिनदिक्कतपणे वापर करताना दिसत होते.

निवडणुकीसाठी भाजप आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी मांडलेल्या टेबलांवरून मतदारांना स्लिप, क्रमांक देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, पुढारी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा आढावा घेताना दिसत होते. यामध्ये उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उरण पंचायत समितीचे सभापती ॲड. सागर कडू यांचा समावेश होता. उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये ७५.२८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप खोमोणी यांनी दिली. तर पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे उरणमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

एका केंद्रावर बिघाड चाणजे ग्रामपंचायतीच्या एका मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मतदान यंत्र काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते. त्यामुळे दहा मिनिटांचा खोळंबा झाला. मात्र बंद पडलेले यंत्र तत्काळ बदलण्यात आले. यामुळे मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. 

मतदानाची टक्केवारीचाणजे     ७१.२९ टक्केकेगाव     ७८.२८ टक्केनागांव     ७७.२७ टक्केम्हातवली     ७८.९१ टक्केफुंडे     ८७.१४ टक्केवेश्वी     ९०.५० टक्के

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत