शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील ७५ गाव-पाडे टंचाईग्रस्त

By admin | Updated: April 4, 2016 02:10 IST

कर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे.

संजय गायकवाड,  कर्जतकर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही दिवसांनी टँकर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.कर्जत तालुक्यातील प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. तो आराखडा तयार करताना तालुक्यात गावपातळीवर सुरू असलेल्या नळपाणी योजना यांची कामे, जलसंधारणअंतर्गत सुरू असलेली कामे यांचा विचार करण्यात आला. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची नावे निश्चित करून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.संभाव्य पाणीटंचाईग्रस्त वाड्यामध्ये (टाकाची वाडी-दामत), खांडसवाडी, वेणगाव कातकरवाडी, भडवळ कातकरवाडी, डोणेवाडी, नवसूची वाडी, जांभूळवाडी (वारे), हाऱ्याची वाडी (वारे), देऊळवाडी, कोळ्याची वाडी, दोरेवाडी (कशेळे), कातकरवाडी (कशेळे), चिमटेवाडी (नांदगाव), भोपळेवाडी (नांदगाव), चौधरवाडी, आनंदवाडी-मोग्रज, वाघ्याची वाडी (बेडीसगाव), कोतेरीवाडी (बेडीसगाव), चोरीची वाडी (बेडीसगाव), शाळेची वाडी (बेडीसगाव), कुंडवाडी-बेडीसगाव, तिवरे-बौध्दवाडी, माले-कातकरवाडी, पोटल मुस्लीम वस्ती, आधाकवाडी (शेलू), बौध्दवाडा (शेलू, कळंब-सुतारपाडा,) गरुडपाडा, बीड कातकरवाडी, मोहिली कातकरवाडी, बेकरेवाडी, सराईवाडी, वरईवाडी (मानिवली), सालवाडी, भालीवडी, जांभूळवाडी (मोग्रज), मल्याची वाडी, मिरचूलवाडी (कळंब), बोरीची वाडी (कळंब), ताडवाडी, मोरेवाडी, वर्णे ठाकूरवाडी, पळसदरी-ठाकूरवाडी येथे पाणीटंचाईसदृश परिस्थिती असून, तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.> कळंब (गावठाण), कुंडलज, जांभिवली, अंथ्राट वरेडी, बोरगाव, ओलमण, मुळगाव, खांडपे, कोंदिवडे, बीड, नेवाळी, लाडीवली, तिवणे(वासरे), दहिगाव, वरई, आडिवली, आर्ढे, पाली गाव, आंबोट, पोटल, किरवली, सालपे, कडाव, सावळा, हेदवली, गुडवण, किकवी, आषाणे, कोषाणे, मोग्रज, माणगाव (खांडपे), पोसरी, तिवरे ही गावे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त आहेत. याठिकाणी टँकरने अधूनमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र बहुतांश पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याशिवाय बोअरवेलसाठीही काही गावांत प्रयत्न सुरू आहेत.