शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

रेती लिलावातून ७५ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 02:23 IST

रायगड जिल्ह्यातील रेती उत्खननाला पर्यावरण विभागाने हिरवा झेंडा दाखविला आहे. जिल्हा प्रशासन कुंडलिका नदी आणि रेवदंडा खाडीतील १२ गटांचा लिलाव करणार आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील रेती उत्खननाला पर्यावरण विभागाने हिरवा झेंडा दाखविला आहे. जिल्हा प्रशासन कुंडलिका नदी आणि रेवदंडा खाडीतील १२ गटांचा लिलाव करणार आहे. या माध्यमातून सुमारे ७५ कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होणार आहे. अवैध रेती उपसा करणाऱ्या रेतीमाफियांच्या काळ््या साम्राज्याला या लिलावाने सुरुंग लागल्याचे बोलले जाते. गेले तीन वर्षे लिलाव बंद असल्याने जिल्हा प्रशासनाला सुमारे २०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते. या कालावधीच अवैध मार्गाने रेती व्यवसाय करणारे रेती माफिया हे चांगलेच गब्बर झाले आहेत. त्यांनी कारवाई करणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले केले होते. तसेच त्यांच्या अवैध रेती उपशामुळे हातपाटी रेती व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. कायदेशीर मार्गाने रेती व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. परंतु पर्यावरण आणि सीआरझेडमुळे रेती उपसा करण्याला परवानगी मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. रेती माफियांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी आणि हजारो कोटी रुपयांच्या बुडणाऱ्या महसुलाचे गणित सरकारच्या लक्षात आल्याने रेतीच्या लिलावांना परवानगी मिळाली आहे. नदी अथवा खाडीच्या चॅनेलमधील गाळ काढण्यासाठी उपसा करण्यासाठी परवानगी दिली जाते. प्रथमच रेतीसाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. १८ एप्रिलपासून याबाबतची प्रक्रिया सुरु होणार असून २७ एप्रिल रोजी आॅनलाइन प्रक्रिया बंद होणार आहे. २८ एप्रिलला निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिली.