शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

७४३ भूखंडांची सोडत

By admin | Updated: August 15, 2015 22:48 IST

तरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणाऱ्या गावठाणामधील आणि गावठाणाबाहेरील बांधकामाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भूखंडांची सहावी

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणाऱ्या गावठाणामधील आणि गावठाणाबाहेरील बांधकामाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भूखंडांची सहावी संगणकीय सोडत आज काढण्यात आली. या सोडतीद्वारे कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली गावांतील ७४३ बांधकामधारकांच्या भूखंडांचे क्रमांक निश्चित करण्यात आले. या सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोच्या संकेतस्थळवरून करण्यात आले.या सोडतीस पर्यवेक्षण समितीचे सदस्य म्हणून निवृत्त न्यायाधीश एम. एन. कुलकर्णी, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी व्ही. एस. धोंगडे, महावितरणचे उपमहाव्यवस्थापक (मा.तं.) जयप्रकाश सोनी, पत्रकार मनोज जालनावाला आणि सिडकोचे माजी मुख्य अभियंता के. वाय. जोशी यांनी उपस्थिती दर्शविली.सोडतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करताना बांधकामधारकाचे नाव, बांधकामधारकाची पात्रता आणि उपलब्ध भूखंडांची संख्या या गोष्टींचा विचार करण्यात आला. पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी उलवे नोडमधील वहाळ येथे भूखंड विकसित करण्यात येत आहेत. एकूण १६७ ब्लॉक्सपैकी कोल्ही गावासाठी १० ब्लॉक्स, कोपरगावासाठी २५ ब्लॉक्स, वाघिवाली वाडा गावासाठी १३ ब्लॉक्स, वरचे ओवळे गावासाठी १५ ब्लॉक्स, उलवे गावासाठी २८ ब्लॉक्स, तरघर गावासाठी १४ ब्लॉक्स, कोंबडभुजे गावासाठी २७ ब्लॉक्स, गणेशपुरी गावासाठी १९ ब्लॉक्स आणि वाघिवली गावासाठी १६ ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये ठरावीक क्षेत्रफळाचे भूखंड आहेत. सोडतीतील निर्णयानुसार ब्लॉकमधील भूखंड क्रमांक निश्चित करण्यात आले.सोडतीनंतर संपूर्ण निकालाचा तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निकालाची प्रत सिडकोच्या सूचना फलकावरदेखील प्रदर्शित करण्यात आली आहे. सोडतीमधील भूखंडाचे वाटप भूसंपादनाचा निवाडा जाहीर केल्यानंतर होणार आहे. (प्रतिनिधी)