शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

५८३ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात, मोबाइल वापरास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:28 IST

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.

- प्राची सोनवणेनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.मुंबई विभागीय बोर्डांतर्गत ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण मुंबई, मुंबई पश्चिम विभाग, तर मुंबई उत्तर विभागातील ५८३ परीक्षाकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. यासाठी ७४ परिक्षण केंद्रांची निवड केली आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रप्रमुख, अतिरिक्त केंद्रप्रमुख, तसेच परीक्षकांची नियुक्ती केली आहे.गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिकेवर शासनाकडून निर्णय होईल. Þयावेळी प्रश्नपत्रिकेची पाकिटे वर्गातच उघडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची संधीगेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या, विषय न सुटलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार, १७ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये रीपिटर्स, श्रेणीसुधार, तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्यांचा समावेश असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे. मूळ परीक्षा फी ३२५ रुपये असून, मुदतीनंतर मूळ परीक्षा फीवर प्रतिदिन ५० रुपये व त्यानंतर दिवसाला १०० व २०० रुपये आकारले जातात.स्मार्ट फोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी ठेवण्यात आलेली आहे. याकरिता सर्वच केंद्रातील मुख्याध्यापकांच्या विशेष बैठका घेऊन याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षाकेंद्रावर केवळ केंद्रसंचालक मोबाइल फोनचा वापर करू शकणार आहेत. परीक्षार्थींनी मोबाइल फोन आणूच नये, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.- डॉ. सुभाष बोरसे, प्रभारी सचिव, राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई

टॅग्स :examपरीक्षा