शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यातील ४३ गावे हागणदारीमुक्त

By admin | Updated: March 28, 2017 06:14 IST

‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यात हागणदारीमुक्तीचा नारा आतापर्यंत ४३ ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचला आहे.

मयूर तांबडे / पनवेल‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यात हागणदारीमुक्तीचा नारा आतापर्यंत ४३ ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचला आहे. तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित २६ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे. यासाठी आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ४३ ग्रामपंचायती शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.उर्वरित गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आराखडा तयार करण्यात आला असून काम प्रगतिपथावर आहे. संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अधिकाऱ्यांनी गावोगाव पिंजून काढले आहेत. शौचालयाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. गावात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्याला १२ हजार रु पयांचे अनुदान देण्याची सोय केली आहे. तालुक्यातील अन्य गावांचा पंचायत समितीमार्फत सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार इतर गावे देखील लवकरच हागणदारीमुक्त होणार आहेत. या कुटुंबांनीही शौचालय बांधावेत यासाठी पंचायत समितीकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.तालुक्यातील ४३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. उर्वरित २७ ग्रामपंचायती ९० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. लवकरच संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त होईल.- धोंडू तेटगुरे, गटविकास अधिकारी, पनवेल पंचायत समितीहागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीसावळे, आकुर्ली, चिखले, खैरणे, वहाळ, कोळखे, आदई, पालीदेवद, विचुंबे, केवाळे, चिंध्रण, खानाव, वलप, गिरवले, दापोली, पळस्पे, देवलोळी, चिपळे, कराडे खुर्द, उसर्ली, नेरे, नितलस, शिवकर, जांभिवली, कोन, उमरोली, दिघाटी, हरिग्राम, पाले बुद्रुक, वाकडी, बारवई , भातान, न्हावे, नानोशी, खानावले, सोमटणे, कसलखंड, कुंडेवहाळ, कर्नाळा, मोरबे, कानपोली, करंजाडे, सांगुर्ली.