शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण, महिनाभरात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:05 IST

पनवेल महपालिका क्षेत्रात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. विशेषत: डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेल - पनवेल महपालिका क्षेत्रात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. विशेषत: डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, डेंग्यूने मागील महिनाभरात दोन जणांचा जीव घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोके वर काढू नये, रोगराईला आळा बसावा, यासाठी पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतरही डेंग्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पालिकेकडून घरोघरी जाऊन डेंग्यूच्या अळ्या शोधल्या जात आहेत. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे काम हाती घ्यायला हवे. तालुक्यातील आपटा येथे १, गव्हाण ५, तर वावंजे १, नेरे १ आणि अजिवली येथे ३ असे एकूण ११ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. तर पालिका हद्दीतील खारघर ११, कामोठे २, कळंबोली १, पनवेल, नवीन पनवेलमध्ये १६ डेंग्यूचे संशयित रु ग्ण आढळले आहेत. तर उरण तालुक्यातील एकूण पाच डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल