कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाच्या कामांमध्ये बाधीत होणा:या जलवाहिन्या आणि भुयारी गटारांची पुनर्रचना करून नवीन वाहिन्या टाकण्याच्या प्रशासनाने दाखल केलेल्या
प्रस्तावांवर शनिवारी स्थायी समितीत वादळी चर्चा झाली. ठराविक कंत्रटदारांनाच कामे दिली जात असल्याकडे लक्ष वेधताना निविदा प्रक्रियेत अधिका:यांकडुन 4क् टकके भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केल्याने प्रशासनाची कार्यपध्दती संशयाच्या फे:यात सापडली आहे. जलवाहीनी आणि भुयारी गटारांच्या कामांचे तब्बल 12 कोटी रूपयांचे प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केले होते. यापैकी 2 कोटी 13 लाख 63 हजार 297 रूपयांच्या गटार वाहिन्या टाकण्याचे काम मे.एस.बी.खकाळ यांना तर जलवाहिन्या टाकण्याची 1क् कोटी 12 लाख 86 हजार 88 रूपयांची 6 कामे मे. एस. एस. अभ्यंकर यांना देण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले होते. हे प्रस्ताव चर्चेला येताच स्थायीचे सदस्य बाळ हरदास यांनी ठराविक कंत्रटदारालाच कामे मिळण्यासाठी प्रशासन प्रय} करीत असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. या आरोपावरून सदस्य वामन म्हात्रे, मनोज घरत, रमेश म्हात्रे यांनीही प्रशासनाला फैलावर घेतले. निविदा प्रचिलित दरापेक्षा वाढीव 7 ते 16 टकके दराने कशा आल्या? असा सवाल ही केला़ तीनदा निविदा काढून प्रतिसाद मिळत नाही, काही ठराविक कंत्रटदारांना कामे मिळण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार अटीशर्ती बनविल्या जातात, या अटी जाचक ठरत असल्याने अन्य कंत्रटदारांकडून निविदांना प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप सदस्यांनी केला़ एकाच ठेकेदाराला 6 कामे दिली जात असताना त्याच्याकडे ही कामे करण्याइतपत मनुष्यबळ आहे का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
भ्रष्टाचाराच्या या आरोपांचे प्रशासनाने खंडन केले. दोनदा निविदा मागविण्यात आल्या होत्या़ परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने तिस:यांदा एकमेव निविदा प्राप्त झाल्याने संबंधितांना कामे दिल्याचे स्पष्टीकरण शहर अभियंता पी. के. उगले यांनी दिले. अखेर ही कामे तातडीने करावयाची असल्याने याला मंजूरी देताना सदस्यांनी वाढीव दराच्या निविदा प्रकरणी भविष्यात काही कायदेशीर कारवाई झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करून बचावात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)
‘ त्या ’ कंत्रटदाराला जलवाहिनीची कामे
डोंबिवली येथील तरणतलावाच्या दुरवस्थेप्रकरणी संबंधित कंत्रटदार एस.एस.अभ्यंकर यांची अनामत रककम जप्त करून तलाव ताब्यात घ्या असे आदेश 31 जानेवारी 2क्14 च्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आले होते. तत्कालीन समितीचे सदस्य तथा विद्यमान सभापती दीपेश म्हात्रे यांनीच दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. याच कंत्रटदाराला सभापती म्हात्रेंच्या समितीने आता जलवाहिन्या टाकण्याची 1क् कोटी 2क् लाखांची कामे दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.