शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने मत्स्य योजनेसाठी ३८ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला - पुरुषोत्तम रुपाला 

By योगेश पिंगळे | Updated: October 6, 2023 15:29 IST

नवी मुंबईतील वाशी येथे शुक्रवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय मस्त्य संमेलनात ते बोलत होते.  

नवी मुंबई : स्वातंत्र्यकाळापासून ते २०१४ सालापर्यंत देशात जेवढे सरकार झाले त्यांनी मत्स्य योजनेसाठी ३ हजार ६८० कोटी रुपये खर्च केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करून २०१४ सालापासून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लागू केली. या योजनेच्या माध्यमातून तब्बल ३८ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली. नवी मुंबईतील वाशी येथे शुक्रवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय मस्त्य संमेलनात ते बोलत होते.    देशाचे जवान ज्याप्रमाणे देशाची सुरक्षा करतात त्याप्रमाणे देशातील मच्छिमार हे समुद्रात सुरक्षेचे काम करत असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यनंतर या क्षेत्राला स्पर्श करणारे पंतप्रधान मोदी हे असून मंत्रालय बनविल्यावर सुरुवातीला २० हजार कोटींचा निधी तसेच इन्फ्रास्टक्चरसाठी ८ हजार कोटी रुपये दिले होते. मत्स्य क्षेत्राशी निगडित नागरिकांचा पाठिंबा वाढला असून सध्या ६३ हजार कोटी रुपयांची निर्यात या क्षेत्रात होत असल्याचे रुपाला यांनी सांगितले. बोटींसाठी देखील विविध टेक्नॉलॉजी बनविण्यात आल्या असून त्यांचा वापर वाढला पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

सहकार भारती मत्स्य क्षेत्राला पुढे नेण्यासाठी काम करत असल्याचा आनंद असून शेतकऱ्यांप्रमाणे कर्जाची योजना मत्स्य व्यवसायाशीनिगडित लोकांना पंतप्रधान देणार असल्याचे सांगत फिशरमॅनला किसान क्रेडिट कार्ड देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. यामधून सात टक्के व्याजदराने १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम सहज उपलब्ध होणार असून वेळेत कर्जाची परतफेड केल्यास ३ टक्के व्याज सरकार भरणार असल्याचे रुपाला यांनी सांगितले. 

व्यवसायात टेनॉलॉजीचा वापर केल्यास उत्पन्नात नक्कीच वाढ होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रमेश पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, डॉ.उदय जोशी, जयंतीभाई केवट, रामदास संधे, जयदीप पाटील आदी मान्यवर आणि देशातील सुमारे २६ राज्यातील मत्स्य क्षेत्राशी निगडित प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई