लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर (वगळून) आणि पनवेल (यासह) दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ३० सप्टेंबर रोजी २३.०० ते २ ऑक्टोबर रोजी १३.०० वाजेपर्यंत ३८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल स्टेशनवर अप आणि डाउन मार्गावर बेलापूर (वगळून) आणि पनवेल (यासह) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन्स आणि नॉन-इंटरलॉकिंगसह विद्यमान अप आणि डाउन हार्बर लाईन्स कट आणि जोडण्यासाठी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अप आणि डाउन २ नवीन मार्गिकांच्या बांधकामाच्या सोयीसाठी पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंगचे कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे परिणाम - ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत. हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/ओरीजनेट होतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यानच चालतील. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २१.०२ वाजता सुटेल आणि २२.२२ वाजता पनवेलला पोहोचेल. ब्लॉकच्या आधी पनवेलहून अप हार्बर मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल २२.३५ वाजता पनवेलहून सुटेल आणि ३० सप्टेंबर रोजी २३.५४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. • ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून २१.३६ वाजता सुटेल आणि २२.२८ वाजता पनवेलला पोहोचेल. • ब्लॉकच्या आधी ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची अप लोकल २१.२० वाजता सुटेल आणि ३० सप्टेंबर रोजी ठाण्याला २२.१२ वाजता पोहोचेल. पनवेलसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ब्लॉकनंतर २ ऑक्टोबर रोजी पहिली लोकल ट्रेन १२.०८ वाजता सुटेल आणि १३.२९ वाजता पनवेल येथे पोहोचेल. • ब्लॉकनंतर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेल येथून २ ऑक्टोबर रोजी १३.३७ वाजता सुटेल आणि १४.५६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ठाणे ते पनवेलसाठी ब्लॉकनंतर २ ऑक्टोबर रोजी पहिली लोकल ट्रेन १३.२४ वाजता ठाण्याहून सुटेल आणि १४.१६ वाजता पनवेलला पोहोचेल. • ब्लॉकनंतर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने २ ऑक्टोबर रोजी पहिली लोकल ट्रेन पनवेलहून १४.०१ वाजता सुटेल आणि ठाण्यात १४.५४ वाजता पोहोचेल.