शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये अडकलेले 37 पर्यटक पनवेलमध्ये परतले, काश्मीर वरून विशेष विमानाची व्यवस्था 

By वैभव गायकर | Updated: April 24, 2025 23:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांच्याशी आमदार विक्रांत पाटील यांनी समन्वय साधून या पर्यटकांना विशेष विमानाने त्यांना मुंबई मध्ये आणण्यात आले.

पनवेल : पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेल मधील पर्यटक देखील शिकार झाले.दोन जण जखमी झाले तर एक जणाला दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागले.यापैकीच काही पर्यटक काश्मीर येथे अडकले होते. यापैकी निसर्ग टूर्सच्या 37 पर्यटकांना दि.24 रोजी मुंबई येथे आणण्यात आले.त्यानंतर विमातळावरून बसच्या साहाय्याने हे पर्यटक पनवेलला दाखल झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांच्याशी आमदार विक्रांत पाटील यांनी समन्वय साधून या पर्यटकांना विशेष विमानाने त्यांना मुंबई मध्ये आणण्यात आले. यावेळी आ. विक्रांत पाटील हे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या सतत संपर्कात होते. पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर देखील वेळोवेळी पर्यटक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. निसर्ग टूर्सचे एकूण 39 पर्यटक काश्मिर मध्ये होते. त्यापैकी जखमी असलेले सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील हे दोघेही अद्याप काश्मीर मधील सुरक्षा दलाच्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी दिली.गुरुवारी रात्री हे पर्यटक पनवेल मध्ये आपल्या घरी परतले.यावेळी संबंधित पर्यटक प्रचंड तणावात होते. अनेकांना आपल्या कुटुंबियांना भेटल्याने आश्रु अनावर झाले.यावेळी आ.विक्रांत पाटील यांच्या माध्यमातुन मुंबईत दाखल झालेल्या पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला याचा मला आनंद आहे. केंद्रित मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी  विशेष विमान आयोजित करून पनवेलकराना सुखरूप घरी आणल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत.- विक्रांत पाटील (आमदार)

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाpanvelपनवेल